पीएमआरडीएने पेठ क्र. १२ मधील ३४० आणि पेठ क्र. ३०-३२ मधील ४९३ अशा एकूण ८३३ शिल्लक सदनिकांसाठी १४ डिसेंबर रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. तांत्रिक अडचणी आणि कागदपत्रे गोळा करण्यासाठी लागणारा वेळ यामुळे अनेक इच्छुक नागरिकांना अर्ज भरता आले नव्हते. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने मुदतवाढीचा निर्णय घेतला आहे.
advertisement
अर्ज भरताना नागरिकांना काही तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागला होता. तसेच अनेक लाभार्थ्यांकडे वेळेवर आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नव्हती. अधिकाधिक सामान्यांना आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करता यावं, यासाठी ही सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पीएमआरडीएच्या सहआयुक्त (जमीन व मालमत्ता विभाग) पूनम मेहता यांनी आवाहन केलं आहे की, नागरिकांनी मुदतवाढीचा फायदा घेऊन आपले अर्ज वेळेत सादर करावेत. अर्ज भरण्यापूर्वी अधिकृत सूचनेनुसार सर्व कागदपत्रांची पूर्तता असल्याची खात्री करून घ्यावी.
अर्ध्या पुण्याचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद
पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. शहरातील विविध जलशुद्धीकरण केंद्रे आणि पंपिंग स्टेशनमध्ये तातडीची विद्युत आणि देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. यामुळे गुरुवारी (२९ जानेवारी) शहराच्या निम्म्याहून अधिक भागाचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दिवसभर पाणी बंद राहिल्यानंतर, शुक्रवारी (३० जानेवारी) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी बुधवारीच पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
