TRENDING:

Police Bharati: लेखी ते मैदानी, आता पोलीस भरतीवर AI चा 'वॉच', पुण्यात नेमकी भरती कशी?

Last Updated:

Police Bharati: पोलीस शिपाई, वाहनचालक तसेच कारागृह विभागातील भरती आता पूर्णपणे एआयच्या कडक देखरेखीखाली पार पडणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पोलिस भरती प्रक्रियेत कॉपी, डमी उमेदवार आणि शारीरिक चाचण्यांमधील फसवणूक रोखण्यासाठी पुणे शहर पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. यंदा आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. पोलिस शिपाई, वाहनचालक तसेच कारागृह विभागातील भरती आता पूर्णपणे एआयच्या कडक देखरेखीखाली पार पडणार आहे. यामुळे भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि अचूक होईल, असा विश्वास वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
Police Bharati: लेखी ते मैदानी, आता पोलीस भरतीवर AI चा 'वॉच', पुण्यात नेमकी भरती कशी?
Police Bharati: लेखी ते मैदानी, आता पोलीस भरतीवर AI चा 'वॉच', पुण्यात नेमकी भरती कशी?
advertisement

भरतीसाठी उमेदवार मैदानात प्रवेश करताच त्याचा चेहरा आधी नोंदवलेल्या माहितीशी त्वरित जुळवला जाणार आहे. चेहरा ओळख प्रणालीमुळे डमी उमेदवार उभा करण्याचा कोणताही प्रयत्न झाल्यास प्रणाली तत्काळ इशारा देईल. तसेच छातीची मोजणी करताना उमेदवार मैदानाबाहेर गेला आणि परत आला, तर तोच उमेदवार आहे की नाही, याची खात्रीही एआय प्रणालीद्वारे केली जाणार आहे. त्यामुळे मध्यंतरी उमेदवार बदलण्याची शक्यता पूर्णपणे बंद होणार आहे.

advertisement

पुन्हा डोकं वर काढतोय महारोग, पुणे विभागातून धडकी भरवणारी आकडेवारी समोर

धाव चाचणीदरम्यान वेळेची हेराफेरी टाळण्यासाठी धावपट्टीवर विशेष सेन्सर बसवले जाणार आहेत. उमेदवाराने धाव पूर्ण करण्यासाठी घेतलेला अचूक वेळ थेट संगणकीय प्रणालीत नोंदवला जाईल. यामुळे मानवी चूक किंवा जाणूनबुजून केलेली गडबड टाळता येणार असून, सर्व उमेदवारांना समान व न्याय्य संधी मिळणार आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सावधान! थंडीच्या दिवसांत ‘हार्ट अटॅक’चा धोका, कारण काय? अशी घ्या काळजी
सर्व पहा

यंदाच्या भरती प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज प्राप्त झाले आहेत. पोलिस शिपाईच्या 1 हजार 833 पदांसाठी तब्बल 86 हजार 240 अर्ज आले आहेत. वाहनचालकाच्या 103 पदांसाठी 42 हजार 896 अर्ज, तर कारागृह शिपाईच्या 130 पदांसाठी 20 हजार 791 अर्ज दाखल झाले आहेत. एआयच्या वापरामुळे फसवणूक करणाऱ्यांचा मार्ग बंद होईल आणि प्रामाणिक उमेदवारांना न्याय मिळेल, असा ठाम विश्वास पोलिस प्रशासनाने व्यक्त केला आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Police Bharati: लेखी ते मैदानी, आता पोलीस भरतीवर AI चा 'वॉच', पुण्यात नेमकी भरती कशी?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल