प्रवाशांना दिलासा! धुक्यामुळे विमानाला होणारा विलंब टळणार; पुणे विमानतळाचं महत्त्वाचं पाऊल
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
या सरावाचा मुख्य उद्देश धुक्याच्या परिस्थितीत विमानतळाची कार्यान्वयन क्षमता वाढवणे आणि प्रवाशांना कमीत कमी त्रास होईल याची खात्री करणे हा होता.
पुणे: हिवाळी हंगामात निर्माण होणाऱ्या धुक्यामुळे कमी होणारी दृश्यमानता आणि त्यामुळे विमान वाहतुकीत येणारे अडथळे प्रभावीपणे हाताळण्यासाठी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी व्यापक तयारी करण्यात आली. ऑपरेशनल सज्जता वाढवण्याच्या उद्देशाने 'कमी दृश्यमानता व्यवस्थापन' या विषयावर एक विशेष मॉकड्रिल आणि टेबल टॉप चर्चेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या सरावाचा मुख्य उद्देश धुक्याच्या परिस्थितीत विमानतळाची कार्यान्वयन क्षमता वाढवणे आणि प्रवाशांना कमीत कमी त्रास होईल याची खात्री करणे हा होता. विशेषतः उत्तर भारतातील अनेक विमानतळांवर दाट धुक्यामुळे विमानांना होणारा विलंब, विमानांचे मार्ग बदलणे किंवा विमानांना रद्द करण्यासारख्या समस्यांवर त्वरित, समन्वित आणि एकसमान पद्धतीने तोडगा काढण्यासाठी सराव करण्यात आला. यामुळे भविष्यात अशा परिस्थितीमध्ये जलद आणि कार्यक्षम प्रतिसाद देणे शक्य होणार आहे.
advertisement
या महत्त्वाच्या सरावात पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांच्यासह विमान कंपन्यांचे प्रतिनिधी, विमानतळ प्रशासनाचे प्रमुख अधिकारी आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (CISF) जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व विभागांच्या कर्मचाऱ्यांनी कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीत समन्वय साधून काम करण्याची तयारी तपासली. जेणेकरून विमानांचे परिचालन सुरक्षितपणे आणि वेळेवर होऊ शकेल. प्रवाशांचे समाधान सुनिश्चित करणे आणि त्यांना योग्य माहिती वेळेत उपलब्ध करणे, यावरही या सरावात विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.
advertisement
कमीत कमी वेळेत धावपट्टीवरील दृश्यमानता कशी तपासावी, विमानांना सुरक्षितपणे उतरवण्यासाठी आणि उड्डाण करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपकरणांचा वापर कसा करावा, अशा सर्व बाबींचा प्रत्यक्ष अभ्यास करण्यात आला. या समन्वित प्रयत्नांमुळे पुणे विमानतळ प्रशासन आता हिवाळी आव्हानांना तोंड देण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे दिसून आले.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 14, 2025 1:54 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
प्रवाशांना दिलासा! धुक्यामुळे विमानाला होणारा विलंब टळणार; पुणे विमानतळाचं महत्त्वाचं पाऊल









