नेमकी कारवाई काय?
मिळालेल्या माहितीनुसार, तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवलाख उंबरे येथे एक वृद्ध व्यक्ती गांजाची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी (६ डिसेंबर) सापळा रचून धर्माजी बधाले (वय ७८, रा. नवलाख उंबरे) यांची झडती घेतली. त्यांच्या झडतीमध्ये पोलिसांना २०० ग्रॅम गांजा सापडला, जो त्यांनी विक्रीसाठी ठेवला होता.
advertisement
केदारनाथच्या महापुरात वाहून गेला; छ. संभाजीनगरला पोहोचला, आता 10 वर्षांनी घरच्यांना पुण्यात सापडला
गुन्हे शाखा युनिट क्रमांक ४ मधील पोलीस अंमलदार शामसुंदर गुट्टे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. ७८ वर्षांचे वय असतानाही धर्माजी बधाले हे अमली पदार्थांच्या व्यापारात कसे ओढले गेले, त्यांच्यामागे आणखी कुणाची मोठी साखळी आहे का, याचा तपास आता पोलीस करत आहेत. या कारवाईमुळे परिसरात अंमली पदार्थ विकणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत
वनविभागाच्या जमिनीवर गांजाची शेती
दरम्यान धुळे जिल्ह्यातून एक अजब आणि धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. यात शिरपूर तालुक्यात पोलीस प्रशासनाने एक मोठी कारवाई केली आहे. वनविभागाच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे करण्यात येणाऱ्या गांजाच्या शेतीचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून, कोट्यवधी रुपयांचे पीक नष्ट केले आहे. शिरपूर तालुक्यातील जामण्यापाणी या अत्यंत दुर्गम आणि डोंगराळ भागात ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तस्करांनी वनविभागाच्या जमिनीचा वापर करून तिथे छुप्या पद्धतीने गांजाची लागवड केली होती.
