TRENDING:

भरपावसात पुणेकरांना पाण्याची वाट पाहावी लागणार! ‘या’ भागात आता तीन टप्प्यात पाणी, पुरवठ्याच्या वेळेत बदल!

Last Updated:

Pune News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी असून पाणीपुरवठ्याच्या वेळेत बदल होणार आहेत. विमाननगर, लोहगाव, धानोरीसह इतर भागातील पाणीपुरवठ्याच्या वेळेबाबत जाणून घेऊ.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता शहरातील काही भागात पाणीपुरवठ्याच्या वेळेत मोठे फेरबदल होणार आहेत. महापालिकेच्या भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेंतर्गत विमाननगर, लोहगाव, हरणतळे, धानोरी, कलवड या ठिकाणी बांधलेल्या पाण्याच्या टाक्या नव्याने कार्यान्वित केल्या जाणार आहेत. त्यामुळे भामा आसखेड प्रकल्पातून पाणीपुरवठा होणाऱ्या भागात पाण्याची वेळ बदलणार आहे. पहाटे सहा ते अकरा या वेळेत होणारा पाणीपुरवठा आता रात्री मध्यरात्री आणि सकाळी अशा तीन टप्प्यांत केला जाईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ भागातील पाणीपुरवठ्याच्या वेळेत बदल, आता तीन टप्प्यात पाणी!
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ भागातील पाणीपुरवठ्याच्या वेळेत बदल, आता तीन टप्प्यात पाणी!
advertisement

येत्या गुरुवारपासून (31 जुलै) प्रायोगिक तत्त्वावर पाणीपुरवठ्याच्या वेळेमध्ये बदल केला जाणार आहे. हा बदल लक्षात येईपर्यंत काही प्रमाणात नागरिकांना त्रास होण्याची शक्यता आहे. तरीही नागरिकांनी सहकार्य करून बदललेल्या वेळांशी जुळवून घ्यावे, असे बंडगार्डन पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एकनाथ गाडेकर यांनी सांगितले.

Weather Alert: काळजी घ्या! पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा, पुणे ते कोल्हापूर 24 तासांसाठी अलर्ट

advertisement

पाणीपुरवठ्याच्या वेळेतील बदल

पुण्यातील पाणीपुरवठ्याच्या वेळेतील बदलानुसार विश्रांतवाडी, धानोरी, टिंगरेनगर, लोहगाव विमाननगर, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, नागपूर चाळ, वडगाव शेरी, खराडी, चंदननगर या भागात नवीन वेळेत पाणीपुरवठा होणार आहे. धानोरी गावठाण भागात सध्या पहाटे 6 ते दुपारी 3 या वेळेत पाणीपुरवठा होतो. तो आता रात्री 8.45 वा. ते 11.30, पहाटे 4.45 ते 10 आणि दुपारी 3 ते रात्री 10 अशा तीन टप्प्यांत होणार आहे.

advertisement

गोकुळनगर, भैरवनगर, मुंजाबा वस्ती भागाला पहाटे 4 ते 11, दुपारी 12 ते 1.30 या वेळेत, आनंद पार्क भागाला दुपारी 3 ते सायंकाळी 6 आणि रात्री 7 ते 3.45 या काळात पाणी दिले जाईल. तर खेसे पार्क, तुषार पार्क, धानोरी जकातनाका, कलवड या भागाला अनुक्रमे सायंकाळी 7.15 ते रात्री 11, दुपारी 3 ते रात्री 10.30, पहाटे 4.15 ते 7.45 आणि 11.45 ते दुपारी 3.15 या नवीन वेळेत पाणीपुरवठा केला जाईल.

advertisement

महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, नागपूर चाळ, कारागृह रस्ता या भागाला पहाटे 6 ते 9.30-12.30, पहाटे 5 ते 7.45, पहाटे 6 ते सायंकाळी 6 या वेळेत पाणीपुरवठा केला जाईल. तर रामनगर भागात सकाळी 10 ते दुपारी 2.30, गलांडेनगरला रात्री 7 ते 11, वडगाव शेरी भागात दुपारी 3.45 ते सायंकाळी 6.5, मिलिटरी परिसर आणि शुभम सोसायटी भागात सायंकाळी 6 ते रात्री 1 या वेळेत पाणी दिले जाईल, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
भरपावसात पुणेकरांना पाण्याची वाट पाहावी लागणार! ‘या’ भागात आता तीन टप्प्यात पाणी, पुरवठ्याच्या वेळेत बदल!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल