यामुळे ग्रामीण व निमशहरी भागातील नागरिकांना रेल्वे स्टेशनवर जाण्याचा त्रास वाचणार आहे. आधी ही सेवा फक्त काही निवडक शहरी भागांत उपलब्ध होती; मात्र आता पोस्ट विभागाने ती सर्वसामान्य प्रवाशांच्या दारात पोहोचवली आहे. ही सेवा विशेषतः ज्या प्रवाशांकडे इंटरनेट सुविधा नाही किंवा ऑनलाइन व्यवहारात अडचणी येतात, त्यांच्यासाठी ही सुद्धा अतिशय महत्त्वाची ठरणार आहे.
advertisement
ST News : एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे नशीब उजळले; महामंडळाने घेतला मोठा निर्णय
तिकीट बुक करण्याची प्रक्रिया
पोस्ट ऑफिसमधील संगणकावर रेल्वेच्या ‘पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टम’ (PRS) द्वारे प्रवाशांना तिकीट बुक करता येणार आहे. प्रवाशांनी केवळ आपले गंतव्य स्थान, प्रवासाची तारीख आणि वर्ग सांगायचा आहे. संबंधित पोस्ट कर्मचारी तत्काळ संगणकाद्वारे आरक्षण करून तिकीट देणार आहेत. तिकीट रद्द करणे, बदल करणे किंवा चौकशी करण्याच्या सर्व सेवाही याच ठिकाणी मिळतील.
ग्रामीण भागातील प्रवाशांना दिलासा
रेल्वेचे तिकीट मिळवण्यासाठी पूर्वी ग्रामीण भागातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी किंवा जवळच्या रेल्वे स्थानकात जावे लागत होते. अनेकदा प्रवासाचा खर्च आणि वेळ वाया जात असे. मात्र आता ही सेवा स्थानिक पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहेत.
24 तास मिळणार सुविधा
24 तास बुकिंग सेवा काही निवडक पोस्ट कार्यालयांत उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे प्रवासी रात्रीसुद्धा तिकीट आरक्षित करू शकतील. तातडीच्या प्रवासासाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
रेल्वे स्टेशनवरील गर्दी टाळण्यासाठी आणि प्रवाशांना घराजवळच आरक्षणाची सुविधा देण्यासाठी हा निर्णय रेल्वे प्रशासन व पोस्ट विभागाच्या संयुक्त प्रयत्नांतून घेण्यात आला आहे. आता प्रवासाचे नियोजन अधिक सोयीस्कर, जलद आणि सुरक्षित होणार आहे.






