Railway Ticket: फक्त तिकिटासाठी रेल्वे स्टेशनची चक्कर कशाला? थेट पोस्टातून बुक करा तिकीट, संपूर्ण प्रक्रिया

Last Updated:

Railway Ticket: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. आता रेल्वेचं तिकीट घेण्यासाठी स्टेशनवर ताटकळत उभारण्याची गरज नाही. आता पोस्टातूनच थेट तिकीट काढता येणार आहे.

Railway Ticket: फक्त तिकिटासाठी रेल्वे स्टेशनची चक्कर कशाला? थेट पोस्टातून बुक करा तिकीट, संपूर्ण प्रक्रिया
Railway Ticket: फक्त तिकिटासाठी रेल्वे स्टेशनची चक्कर कशाला? थेट पोस्टातून बुक करा तिकीट, संपूर्ण प्रक्रिया
पुणे: रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता रेल्वे तिकीट काढण्यासाठी स्टेशनवर लांब रांगा लावण्याची किंवा ऑनलाइन तिकीट बुकिंगसाठी इंटरनेटचा त्रास घेण्याची आवश्यकता राहणार नाही. भारतीय पोस्ट विभागाने रेल्वेसोबत हातमिळवणी करून प्रवाशांना थेट पोस्ट ऑफिसमधून रेल्वे तिकीट बुक करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. पुणे जिल्ह्यातील अनेक पोस्ट कार्यालयांमध्ये ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.
यामुळे ग्रामीण व निमशहरी भागातील नागरिकांना रेल्वे स्टेशनवर जाण्याचा त्रास वाचणार आहे. आधी ही सेवा फक्त काही निवडक शहरी भागांत उपलब्ध होती; मात्र आता पोस्ट विभागाने ती सर्वसामान्य प्रवाशांच्या दारात पोहोचवली आहे. ही सेवा विशेषतः ज्या प्रवाशांकडे इंटरनेट सुविधा नाही किंवा ऑनलाइन व्यवहारात अडचणी येतात, त्यांच्यासाठी ही सुद्धा अतिशय महत्त्वाची ठरणार आहे.
advertisement
तिकीट बुक करण्याची प्रक्रिया
पोस्ट ऑफिसमधील संगणकावर रेल्वेच्या ‘पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टम’ (PRS) द्वारे प्रवाशांना तिकीट बुक करता येणार आहे. प्रवाशांनी केवळ आपले गंतव्य स्थान, प्रवासाची तारीख आणि वर्ग सांगायचा आहे. संबंधित पोस्ट कर्मचारी तत्काळ संगणकाद्वारे आरक्षण करून तिकीट देणार आहेत. तिकीट रद्द करणे, बदल करणे किंवा चौकशी करण्याच्या सर्व सेवाही याच ठिकाणी मिळतील.
advertisement
ग्रामीण भागातील प्रवाशांना दिलासा
रेल्वेचे तिकीट मिळवण्यासाठी पूर्वी ग्रामीण भागातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी किंवा जवळच्या रेल्वे स्थानकात जावे लागत होते. अनेकदा प्रवासाचा खर्च आणि वेळ वाया जात असे. मात्र आता ही सेवा स्थानिक पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहेत.
24 तास मिळणार सुविधा
24 तास बुकिंग सेवा काही निवडक पोस्ट कार्यालयांत उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे प्रवासी रात्रीसुद्धा तिकीट आरक्षित करू शकतील. तातडीच्या प्रवासासाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
advertisement
रेल्वे स्टेशनवरील गर्दी टाळण्यासाठी आणि प्रवाशांना घराजवळच आरक्षणाची सुविधा देण्यासाठी हा निर्णय रेल्वे प्रशासन व पोस्ट विभागाच्या संयुक्त प्रयत्नांतून घेण्यात आला आहे. आता प्रवासाचे नियोजन अधिक सोयीस्कर, जलद आणि सुरक्षित होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Railway Ticket: फक्त तिकिटासाठी रेल्वे स्टेशनची चक्कर कशाला? थेट पोस्टातून बुक करा तिकीट, संपूर्ण प्रक्रिया
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement