ST News : एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे नशीब उजळले; महामंडळाने घेतला मोठा निर्णय

Last Updated:

Maharashtra Transport News : महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी एसटी महामंडळाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. लवकरच तब्बल 8,3000 स्मार्ट बसगाड्या सेवेत दाखल होणार असून प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि अत्याधुनिक प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.

News18
News18
पुणे : राज्यातील प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळ मोठे पाऊल उचलत आहे. ताफा अद्ययावत करण्याच्या निर्णयानुसार लवकरच 8 हजार 300 नव्या बसगाड्या सेवेत दाखल होणार असून प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि आधुनिक प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.
या वाहनांचा असणार समावेश
महामंडळाच्या या नव्या ताफ्यात साध्या बस, स्मार्ट बस, व्होल्व्हो तसेच मिनी बस या सर्व प्रकारच्या गाड्या समाविष्ट असतील. या बसेस टप्प्याटप्प्याने सेवेत आणण्याचे नियोजन करण्यात आले असून डिसेंबर 2026 पर्यंत सर्व गाड्या रस्त्यावर धावतील अशी अपेक्षा आहे.
सध्या एसटीकडे पुरेशा प्रमाणात बसेस नाहीत. अनेक जुनी वाहने आयुर्मान संपल्यामुळे किंवा नादुरुस्त झाल्यामुळे तात्पुरती दुरुस्ती करून चालवावी लागत आहेत. त्यामुळे वारंवार बस बिघडणे, प्रवासात अडथळे येणे आणि प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागणे, अशी परिस्थिती निर्माण होते. विशेषतहा दिवाळीच्या सणासुदीच्या काळात या समस्या अधिक वाढतात. मात्र, नव्या गाड्या आल्यानंतर ही समस्या मोठ्या प्रमाणावर सुटणार आहे.
advertisement
एआय तंत्रज्ञानाचा करणार वापर
महामंडळाने यापुढे दरवर्षी एक हजार स्मार्ट ई-बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या बसेस अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असतील. विशेष म्हणजे या नव्या बसगाड्यांमध्ये एआय तंत्रज्ञानावर चालणारी आधुनिक सुरक्षा यंत्रणा बसवली जाणार आहे.
पुण्यातील एका कंपनीने उत्तर प्रदेश परिवहन महामंडळासाठी तयार केलेल्या अशाच स्मार्ट ई-बसचे सादरीकरण नुकतेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या समोर करण्यात आले. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील बसेसमध्येही अत्याधुनिक सुरक्षा सुविधा देण्यावर भर दिला जात आहे. या बसमध्ये अशी यंत्रणा असेल की बाहेरील अनोळखी व्यक्ती सहजपणे बसमध्ये प्रवेश करू शकणार नाही तसेच आग लागणे, अपघात किंवा इतर कोणत्याही घटनेवर तातडीने प्रतिसाद देणारी प्रणाली बसवली जाणार आहे.
advertisement
या सर्व नव्या उपाययोजनांमुळे राज्यातील एसटी सेवा आणखी मजबूत होईल. प्रवाशांना वेळेवर, सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवास करता येईल. यामुळे एसटी महामंडळ पुन्हा एकदा जनतेसाठी विश्वासार्ह आणि सोयीची वाहतूक सेवा ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
ST News : एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे नशीब उजळले; महामंडळाने घेतला मोठा निर्णय
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement