Shreyas Iyer : 'देवाने साथ दिली म्हणून...', श्रेयस अय्यरच्या प्रकृतीवर सूर्यकुमारने घेतली प्रेस कॉन्फरेन्स, म्हणाला 'क्रिकेटमध्ये खूप रेअर...'

Last Updated:

Suryakumar Yadav on Shreyas Iyer : देवाने साथ दिली म्हणून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. बीसीसीआयचा श्रेयसला फुल सपोर्ट आहे. त्यानंतर श्रेयसला आम्ही सोबत घरी घेऊ जाऊ, असं सूर्यकुमार म्हणाला.

Suryakumar Yadav On Shreyas Iyer health update
Suryakumar Yadav On Shreyas Iyer health update
Shreyas Iyer Health Update : भारतीय संघाचा टी20 कॅप्टन सूर्यकुमार यादव याने दुखापतग्रस्त श्रेयस अय्यरच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. सूर्यकुमार यादवनं सांगितलं की, श्रेयस अय्यरची प्रकृती सुधारत आहे आणि तो फोनवर टीमला प्रतिसाद देत आहे, याचा अर्थ तो नक्कीच ठीक आहे. सूर्यकुमार यादव म्हणाला की, श्रेयस अय्यरला दुखापत होणे दुर्दैवी आहे, पण डॉक्टर त्याची चांगली काळजी घेत आहेत. पुढील काही दिवस त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जाईल, मात्र काळजी करण्यासारखं काही कारण नाही, असंही सूर्या म्हणाला.

पहिल्या दिवशी त्याला ड्रेसिंग रुममध्ये....

पहिल्या दिवशी मी त्याला फोन केला, तेव्हा त्याने फोन घेतला नाही. त्याकडे फोन नव्हता. त्यानंतर गेल्या दोन दिवसापासून तो फोनवर बोलतोय. याचा अर्थ तो चांगल्या स्थितीत आहे. पहिल्या दिवशी मी फिजिओला फोन करून माहिती घेतली होती. श्रेयसची प्रकृती स्थिर आहे. तो बोलतोय त्यामुळे तो नॉर्मल असल्याचं कळतंय. बाकी माहिती डॉक्टरांना आहे. पहिल्या दिवशी त्याला ड्रेसिंग रुममध्ये नेलं तेव्हा वाटलं की त्याला हॉस्पिटलला घेऊन जाण्याची गरज आहे, त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, असं सूर्यकुमार यादव म्हणाला.
advertisement

श्रेयसला फुल सपोर्ट

क्रिकेटमध्ये असं कधी होत नाही, खूप रेअर गोष्टी अशा होतात, पण श्रेयस देखील रेअर आहे. देवाने साथ दिली म्हणून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. बीसीसीआयचा श्रेयसला फुल सपोर्ट आहे. त्यानंतर श्रेयसला आम्ही सोबत घरी घेऊ जाऊ, असं म्हणत सूर्याने टेन्शन कमी केलं. त्यानंतर पत्रकार परिषदेत सर्वांच्या चेहऱ्यावर हसू फुललं.
advertisement
advertisement

डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू

दरम्यान, टीम इंडियाचा चॅम्पियन बॅट्समन श्रेयस अय्यर याला रिब केजच्या दुखापतीमुळे झालेल्या इंटरनल ब्लीडिंगमुळे सिडनी येथील हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये दाखल करण्यात आलं होतं. अय्यरवर सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. त्याच्या तब्येतीमधील सुधारणेनुसार, त्याला 2 ते 7 दिवसांपर्यंत ऑब्झर्वेशनखाली (Under Observation) ठेवण्यात येईल, अशी माहिती समोर आली आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Shreyas Iyer : 'देवाने साथ दिली म्हणून...', श्रेयस अय्यरच्या प्रकृतीवर सूर्यकुमारने घेतली प्रेस कॉन्फरेन्स, म्हणाला 'क्रिकेटमध्ये खूप रेअर...'
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement