नोव्हेंबर महिन्यात झालेल्या धान्य वितरणाबाबत शहरातील अनेक लाभार्थ्यांच्या मोबाईलवर संबंधित एसएमएस पाठवण्यात आले आहेत. या संदेशात लाभार्थ्याच्या नावावर मिळालेल्या धान्याचा संपूर्ण तपशील स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. संदेशामध्ये ज्वारी, गहू आणि तांदूळ यांसारख्या धान्य प्रकारांपैकी प्रत्येकाचे किती किलो वाटप झाले आहे, हे स्वतंत्रपणे दाखवले आहे.
प्रेमासाठी कायपण! तरुणीनं स्वतःच्याच घरात केली दोनदा चोरी; वैतागलेल्या वडिलांनी धडाच शिकवला
advertisement
या कोट्याचे वितरण राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार पूर्णपणे मोफत करण्यात आल्याचे संदेशामध्ये स्पष्ट नमूद केले आहे. तसेच धान्य घेतल्यानंतर पावती घेणे अनिवार्य असल्याची सूचना लाभार्थ्यांना देण्यात आली आहे. याशिवाय कोणत्याही प्रकारची अडचण किंवा अनियमितता आढळल्यास तक्रार नोंदवण्यासाठी टोल-फ्री क्रमांक 1800224950 आणि 1967 उपलब्ध देण्यात आला आहे.
मेरा रेशन ॲपही माहितीकरिता उपयुक्त
काही लाभार्थ्यांच्या मोबाईलवर तांत्रिक कारणांमुळे एसएमएस न आल्यास धान्याचा तपशील तपासण्यासाठी मेरा रेशन ॲप हा पर्याय उपलब्ध आहे. आधार क्रमांक टाकल्यानंतर मंजूर केलेला कोटा आणि प्रत्यक्षात मिळालेल्या धान्याची माहिती या ॲपवर पाहता येते. म्हणून रेशन दुकानातील उपलब्धता आणि प्रत्यक्ष वितरण यातील फरक ओळखण्यासाठी मेरा रेशन ॲप नागरिकांसाठी मदतीचे साधन ठरत आहे.
मोबाइल क्रमांक जोडणे अनिवार्य
धान्य वितरणासंदर्भातील एसएमएस मिळण्यासाठी रेशन कार्डाशी मोबाइल क्रमांक लिंक करणे आवश्यक असल्याचे पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे. मोबाइल क्रमांक नोंदविल्यानंतर पुढील महिन्यात कोणते व किती धान्य मिळणार आहे याची माहिती एसएमएसद्वारे मिळणार आहे. दरम्यान, काही भागातून चुकीचे एसएमएस येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने पुरवठा विभागाने संबंधित प्रकरणांचा तपास सुरू केला आहे. त्रुटी शोधून आवश्यक ती सुधारणा करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.






