अयोध्या : ज्योतिषशास्त्र सांगतं की, मानवाचं आयुष्य हे त्याच्या कुंडलीतील ग्रह-ताऱ्यांच्या स्थितीवर अवलंबून असतं. जशी ग्रहांची चाल आणि दिशा बदलते तसे आयुष्यात सुख, दुःख येतात. महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक प्रसंगावर ज्योतिषशास्त्रात उपायही दिलेला आहे. अनेकदा लोक वेळ-प्रसंगी पैसे उसणे घेतात, कर्ज काढतात. मग कर्जाचा डोंगर हळूहळू एवढा मोठा होतो की त्यातून डोकं वर काढण्याची हिंमतही होत नाही. अशावेळी जवळचे लोकही दूर जातात आणि मग आपल्याला काय करावं आणि काय नको हेही सूचत नाही.
advertisement
मेहनतीला पर्याय नाही. दुःखाने पण प्रामाणिकपणे कमवून सुखाने खावं असं म्हणतात. परंतु जर खूप गरज असताना कर्ज काढलं आणि मग त्यातून बाहेर पडण्याचा मार्गच सापडत नसेल, तर व्यक्तीनं टोकाचा निर्णय घेण्यापेक्षा ज्योतिषशास्त्रात काही उपाय दिलेले आहेत. अशा लोकांसाठी शनिवार हा अत्यंत महत्त्वाचा वार मानला जातो.
हेही वाचा : 'या' 3 राशींचे लोक जन्मतःच असतात खूप भाग्यवान! त्यांच्या मेहनतीवर प्रसन्न होते लक्ष्मी
डोक्यावर कर्ज असेल तर शनिवारी काळ्या कुत्र्याला मोहरीचं तेल लावलेली चपाती खाऊ घालावी. यामुळे आपल्या डोक्यावरील कर्जाचं ओझं हळूहळू हलकं होतं असं म्हणतात. म्हणजे आपल्याला आपोआप पैसे मिळत जातात असं नाही, तर ते कर्ज फेडण्याची ताकद मिळते आणि मनात सकारात्मकता निर्माण होते. अयोध्येचे ज्योतिषी पंडित कल्की राम यांनी याबाबत माहिती दिली आहे.
तसंच शुक्रवार हा लक्ष्मी देवीला समर्पित असतो. त्यामुळे या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून आंघोळ करून लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची मनोभावे पूजा करावी. त्यांना हळदीची गाठ अर्पण करावी. असं केल्यानं धनलाभ होतो असं म्हणतात. त्याचबरोबर शनिवारी सकाळी आंघोळ केल्यानंतर एका नारळाला धागा गुंडाळावा आणि तो नारळ वाहत्या पाण्यात सोडावा. असं केल्यानं लवकरच कर्जातून मुक्ती मिळते.
सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.