'या' 3 राशींचे लोक जन्मतःच असतात खूप भाग्यवान! त्यांच्या मेहनतीवर प्रसन्न होते लक्ष्मी
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार, काही लोक जन्मतःच भाग्यवान मानले जातात. या राशीच्या व्यक्तींवर धनाची देवता लक्ष्मी देवीची विशेष कृपा असते, असं म्हणतात. म्हणजेच मातीतूनही सोनं उगवेल असं या व्यक्तींचं नशीब असतं. (सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी / अयोध्या)
धार्मिक मान्यतेनुसार, ज्या व्यक्तीच्या पाठीशी लक्ष्मी देवीचा आशीर्वाद असतो, त्या व्यक्तीला कधीच पैशांची कमतरता भासत नाही. अयोध्येचे ज्योतिषी पंडित कल्की राम सांगतात की, लक्ष्मी देवीचा संबंध शुक्र ग्रहाशी आहे. त्यामुळे ज्यांच्या कुंडलीत शुक्राचं स्थान भक्कम असतं, त्यांच्या पाठीशी लक्ष्मी देवीचा विशेष आशीर्वाद असतो. तसंच ज्यांच्यावर लक्ष्मीची कृपा असते त्यांच्या कुंडलीत शुक्राचं स्थान आपसूक भक्कम होतं. मग त्या राशीच्या व्यक्तींना धन, वैभव सारंकाही मिळतं. अशा 3 राशी आहेत, ज्यांच्यावर सदैव लक्ष्मीची कृपा असते.
advertisement
advertisement
कुंभ : या राशीचा स्वामी ग्रह आहे चंद्र. त्यामुळे या राशीचे लोक अत्यंत बुद्धिमान आणि स्वतंत्र विचारांचे असतात. त्यांचं वैशिष्ट्य हेच आहे की, ते कोणत्याही कामाचं चोख प्लॅनिंग आधीच करून ठेवतात. शिवाय त्यांना नवनवीन गोष्टी शिकण्याची तीव्र इच्छा असते. याच त्यांच्या इच्छाशक्तीवर लक्ष्मी देवी प्रसन्न होते.
advertisement
मिथुन : या राशीचा स्वामी ग्रह आहे बुध. त्यामुळे या राशीचे लोक चंचल स्वभावाचे असतात, परंतु त्यांचं व्यक्तिमत्त्व असं असतं की लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात. शिवाय ते खूप मेहनती असतात. त्यांच्या चंचल आणि मेहनती स्वभावावरच लक्ष्मी देवी प्रसन्न होते.
advertisement