नुसता पैसा! पौर्णिमेला 'या' 3 राशींचं नशीब चंद्रासारखं चमकणार
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
ज्योतिषशास्त्रात अमावस्या आणि पौर्णिमा या दोन्ही दिवसांना विशेष महत्त्व आहे. पौर्णिमेला तर चंद्रदेव आपल्या पूर्ण रूपात असतात. त्यामुळे या दिवशी लक्ष्मी-नारायणाची आवर्जून पूजा केली जाते. यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात असं म्हणतात. शिवाय या दिवशी गंगा स्नान, दान-पुण्य, सत्यनारायण व्रत आणि चंद्राला जल अर्पण करण्याला विशेष महत्त्व असतं. (सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी / अयोध्या)
हिंदू पंचांगानुसार, ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमा तिथीला 21 जून रोजी सकाळी 07 वाजून 31 मिनिटांनी सुरुवात होईल आणि दुसऱ्या दिवशी 22 जून रोजी सकाळी 06 वाजून 37 मिनिटांनी ही तिथी संपेल. या दिवशी दान आवर्जून करावं. विशेष म्हणजे या पौर्णिमेला अनेक अद्भुत योगही जुळून येणार आहेत, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींवर होईल. अयोध्येचे ज्योतिषी पंडित कल्की राम यांनी सांगितलंय की, ही पौर्णिमा 3 राशींच्या व्यक्तींसाठी विशेष लाभदायी ठरणार आहे. त्यांच्या पाठीशी लक्ष्मी देवीचा आशीर्वाद कायम राहील.
advertisement
advertisement
advertisement
धनू : आपल्यासाठी हा काळ सुखाचा आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो. व्यापार विस्तारेल. अडकलेली कामं मार्गी लागतील. दाम्पत्य जीवनात सुख येईल. समाजात आपला मान-सन्मान वाढेल.
advertisement