ज्योतिषशास्त्रामध्ये पौर्णिमा व अमावस्या हे दोन्ही दिवस महत्त्वाचे असतात. या दिवशी नेमकं काय करणं शुभ ठरू शकतं, हे देखील ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. बुद्ध पौर्णिमेचा दिवस तर हिंदू धर्मात खूपच महत्त्वाचा मानला जातो.
या दिवशी काही गोष्टींचं दान केल्यानं पितरांच्या आत्म्याला शांती मिळते, व व्यक्तीच्या जीवनात आनंद येतो, असं ज्योतिषी सांगतात. अर्थात या दिवशी कोणत्या गोष्टींचं दान करावं, दान कशा पद्धतीनं करावं, हे देखील माहिती असणं गरजेचं आहे. चला तर, आज आपण त्याबाबतच जाणून घेऊ.
advertisement
चिंता-द्वेष-मत्सर होईल दूर, मिळेल प्रेरणा.. वाचा गौतम बुद्धांचे अमूल्य विचार!
दान करण्यासाठी शुभ मुहूर्त
या वर्षी वैशाख पौर्णिमा अर्थात बुद्ध पौर्णिमेला स्नान आणि दानाची वेळ गुरुवारी (23 मे 2024) पहाटे 4.04 ते पहाटे 5.26 अशी आहे. या दिवशी पहाटे पवित्र नदीत स्नान करावे. त्यानंतर काळे तीळ पाण्यात मिसळून पितरांना अर्पण करावेत. असं केल्याने कलह आणि अशांतता दूर होते. या दिवशी चंद्राला अर्घ्य दिल्यानं शुभ फल मिळतं.
मुकूट की केस; भगवान बुद्धांच्या डोक्यावर ते काय? तुम्ही सांगू शकता?
असं करा दान
बुद्ध पौर्णिमेला दान करण्यापूर्वी सर्वात प्रथम स्नान झाल्यानंतर भगवान श्रीहरी विष्णूची पूजा करावी. भगवान विष्णूला तुळशीची पानं अर्पण करावीत, मिठाईचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर श्री शिवलिंगाजवळ दीप प्रज्ज्वलित करून ‘ॐ नम: शिवाय’या मंत्राचा जप करावा. पूजा झाल्यानंतर पाण्यानं भरलेला मातीचा माठ आणि अन्न दान करावे. या दिवशी मातीच्या भांड्याचं दान करणं, हे गाईचे दान केल्यासमान असतं.
या गोष्टींचे करू शकता दान
बुद्ध पौर्णिमेला पंखा, पाण्याने भरलेला मातीचा माठ, चप्पल, छत्री, धान्य किंवा फळं यांचं दान करता येईल. असं दान केल्याने पितरांना आनंद होतो, अशी मान्यता आहे. तसंच या दिवशी पिवळ्या वस्त्रांचं दान, हंगामी फळांचं दान करावं. कडक उन्हाळ्यात तहानलेल्यांना पिण्याचं पाणी द्यावं. यामुळेही पुण्य मिळतं. अशा व्यक्तींवर नेहमीच पूर्वजांचा आशीर्वाद राहतो.
दरम्यान, बुद्ध पौर्णिमेला दान करण्यास खूप महत्त्व आहे. या दिवशी दान केल्यानं शुभ फळं मिळतात. परंतु त्यावर कितपत विश्वास ठेवायचा, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.