फरिदाबाद : हिंदू धर्मात एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दर महिन्यात एकादशी असते. या दिवशी अनेकजण निर्जळी उपवास करतात. एकादशी ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय असल्याचं मानलं जातं, त्यामुळे ती त्यांनाच समर्पित असते. या दिवशी विष्णूंची मनोभावे पूजा केल्यास आणि व्रत केल्यास मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि आपण आतापर्यंतच्या आयुष्यात केलेले सर्व पाप नष्ट होतात, अशी मान्यता आहे.
advertisement
एकादशीचं निर्जळी व्रत अत्यंत कठीण आणि महत्त्वपूर्ण असतं. महिला दिवसभर पाणीसुद्धा न पिता हे व्रत पूर्ण करतात. पुराणांनुसार, जी महिला हे कठीण व्रत पूर्ण करते तिला निश्चितच त्याचं फळ मिळतं आणि तिचे सगळे दु:ख देवीच्या चरणी गळून पडतात. त्यामुळे आयुष्यात कोणतीही अडचण आल्यास हे व्रत करावं, असं म्हणतात. विवाहित स्त्रिया किंवा कुमारिकादेखील हे व्रत करू शकतात. मात्र ते पाळण्याचे काही नियम आहेत. केवळ उपाशी राहण्यापुरतं हे व्रत मर्यादित नाही, तर या दिवशी झाडांची पानंदेखील तोडायची नसतात.
22 जानेवारीला जन्मणाऱ्या बाळाची कुंडली पाहा, नेमक्या कोणत्या राशीचं असेल बाळ?
जेवण असावं सात्विक!
ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार, एकादशीचं व्रत सोडताना तेलाचे पदार्थ खाऊ नये. या दिवशी साजूक तुपातले पदार्थ खावे. पितळेच्या भांड्यात जेवण बनवलंत तर उत्तम. त्यामुळे आपल्या शरिरातले विषारी घटक बाहेर पडतात. शिवाय या दिवशी मांसाहार केल्यास पुढे त्याचे दुष्परिणाम पाहायला मिळू शकतात.
शुक्र रास बदलतोय, कोणत्या राशीतून कोणत्या राशीत जातोय? या 3 राशींचे दिवस पालटणार हे नक्की!
एकादशीला तांदूळ का खाऊ नये?
तांदूळ हे सजीव मानले जातात. धार्मिक मान्यतेनुसार, एकदा महर्षी मेधा यांनी एका भिक्षूंचा अपमान केला होता. ज्यामुळे दुर्गा देवी त्यांच्यावर प्रचंड क्रोधीत झाली. त्यानंतर महर्षी मेधा यांनी आपलं शरीर दुर्गा देवीला अर्पण केलं. त्यावेळी जमिनीने त्यांना सामावून घेतलं. तेव्हा दुर्गा देवी प्रसन्न झाली आणि तिने महर्षींंना आशीर्वाद दिला की, त्यांचं शरीर भविष्यात अन्नाच्या रूपात उगवेल. त्यानंतर जमिनीतून चक्क तांदूळ आणि त्यामागोमाग ज्वारीचं पीक उगवलं. त्याच दिवशी एकादशी होती. त्यामुळे तांदूळ जिवंत मानले जातात आणि एकादशीच्या दिवशी ते न खाण्याचा सल्ला दिला जातो.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g