देवघर : ज्योतिषशास्त्रानुसार, सर्व ग्रह एका ठराविक वेळानंतर आपली स्थिती बदलतात. काही ग्रह राशीपरिवर्तन करतात. त्यातूनच निर्माण होतात योग. या योगांचा संबंध थेट मानवी जीवनाशी असतो. त्यामुळे एखाद्या ग्रहाने एखाद्या राशीत प्रवेश केला की त्याचा प्रभाव आपल्या सुख, दुःखावर होतो. अनेकदा एकाच राशीत दोन ग्रहांची युतीदेखील होते, तर एकाच राशीत तीन ग्रह एकत्र आले की, निर्माण होतो त्रिग्रही योग. हा योग अनेक राशींसाठी लाभदायी असतो.
advertisement
झारखंडच्या देवघरचे प्रसिद्ध ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुद्गल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंभ राशीवर त्रिग्रही योग निर्माण होणार आहे. तब्बल 30 वर्षांनी हा योग जुळून आलाय. त्यामुळे ज्या राशींवर त्याचा प्रभाव पडेल त्यांना हे वर्ष अतिशय सुखात जाईल हे नक्की.
कुंडलीत 'कालसर्प दोष' नाही ना? नाहीतर नशिबानं गिळलंच म्हणून समजा! तयारीत राहा
सूर्याला ग्रहांचा राजा म्हटलं जातं, तर शुक्राला म्हणतात वैभव आणि धनसंपत्तीकारक. हे दोन्ही ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. शिवाय शनीदेखील या राशीत आधीपासूनच आहे. त्यामुळे हे तीनही ग्रह मिळून तयार होणार आहे त्रिग्रही योग. याचा परिणाम म्हणून काही राशींच्या व्यक्तींची करियरमध्ये प्रगती होईल. त्यांना अचानक धनलाभ होण्याचीही शक्यता आहे. या भाग्यवान राशी आहेत मेष, वृश्चिक आणि मकर.
तुमचा पार्टनर खरंच तुमच्या प्रेमात आहे की चाललाय फक्त Timepass? असं ओळखा लगेच!
मेष : आपल्या उत्पन्नात वाढ होईल. जेवढी गुंतवणूक कराल त्याच्या दुप्पट नफा मिळेल. करियरमध्ये नव्या संधी मिळतील. प्रत्येक कामात यश मिळेल. सूर्य, शुक्र आणि शनीच्या कृपेने नवदाम्पत्याला गोड बातमीही मिळू शकते.
वृश्चिक : आपल्याला अचानक धनलाभ होईल. करियरमध्ये यश मिळेल. नोकरीत मनासारखी बदली मिळेल, आपली बढतीही होऊ शकते. समाजात प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. खर्च कमी आणि उत्पन्न जास्त अशी स्थिती असल्यामुळे तुमची चांगली बचतही होईल. शिवाय वडील आणि मुलाचं नातं भक्कम होईल.
मकर : आपला आत्मविश्वास वाढेल. उत्पन्नातदेखील वाढ होईल. तुमचं मित्रांसोबतचं आणि वडिलांसोबतचं नातं सुधारेल. वडिलोपार्जित संपत्तीबाबत काही वाद असतील तर ते मिटतील. जोडीदारासोबत छान प्रवास होईल. आरोग्यसुद्धा उत्तम साथ देईल.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा