TRENDING:

यंदाच्या नवरात्रीच्या तिथी मध्ये मोठा बदल! उपवासाचे उत्थापन कधी करावं? घट कधी उठवावेत? पाहा

Last Updated:

यंदा जसजस विजयादशमी जवळ येतीय तसा अनेक उपासकांना प्रश्न पडलाय की तिथीत झालेल्या बदलामुळे नेमका उपवास सोडायचा कधी ? आणि घट स्थापना केलेल्या कलशाच विसर्जन कधी करायचं? या प्रश्नांमूळ उपसकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झालीय. याच संदर्भात कोल्हापुरातील प्रसिद्ध ज्योतिषी आणि ज्योतिष शास्त्र विषयाचे अध्यापक ज्योतिषशास्त्री राहुल कदम यांनी माहिती दिलीये. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
निरंजन कामत, प्रतिनिधी 
advertisement

कोल्हापूर : देशभरात नवरात्रीचा उत्साह शिगेला पोचला आहे. घरोघरी महिलांनी घटस्थापना आणि अखंड दिपाची पूजा सुरुये. मात्र यंदा जसजस विजयादशमी जवळ येतीय तसा अनेक उपासकांना प्रश्न पडलाय की तिथीत झालेल्या बदलामुळे नेमका उपवास सोडायचा कधी ? आणि घट स्थापना केलेल्या कलशाच विसर्जन कधी करायचं? या प्रश्नांमूळ उपसकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झालीय. याच संदर्भात कोल्हापुरातील प्रसिद्ध ज्योतिषी आणि ज्योतिष शास्त्र विषयाचे अध्यापक ज्योतिषशास्त्री राहुल कदम यांनी माहिती दिलीये.

advertisement

यंदाच्या नवरात्रीच्या तिथीत मोठा बदल..

देशभरात उत्साहात साजरा केला जाणाऱ्या सणांपैकी शारदीय नवरात्र उत्सव अतिशय उत्साहात साजरा केला जातो. यंदाच्या 2024 वर्षांमध्ये नवरात्र उत्सवात तिथी मध्ये बदल झाल्याचा पाहायला मिळतो. यंदाच्या नवरात्र उत्सवात नवमी आणि दशमी ही तिथी एकत्र म्हणजे एकाच दिवशी आलेले आहेत.

सगळे करतात म्हणून तुम्हीही करता कन्यापूजन? पण नवरात्रीतच का पूजतात मुलींना, माहितीये?

advertisement

घट उठवायचे कधी? उपवासाचे उत्थापन करायचं कधी?

यंदा 12 ऑक्टोबर 2024 ला नवमी आणि दशमी तिथी एकत्र आल्यानं अनेक उपासकांना घट उठवायचे कधी आणि उपवासाचे उत्थापन पण कधी करायचं यासंदर्भात अनेक प्रश्न निर्माण झालेत. दसरा आणि नवमीचा जो घट उठवण्याचा जो कार्यक्रम आहे तो आपल्याला 12 तारखेला म्हणजेच दसऱ्या दिवशीच करावा लागणार आहे. महाअष्टमीचा आणि महानवमीचा उपवास हा शुक्रवारी म्हणजेच 11 तारखेला करायचा आहे. महाअष्टमी महानवमीचा उपवास एकाच दिवशी आलेला आहे. बऱ्याच वेळा तिथींची समाप्ती ही वेगवेगळ्या वेळी येत असल्याने हा विषय निर्माण होतो आणि यावर्षी तो तसा झालेला आहे त्या कारणांनी अष्टमी नवमीचा उपवास एकत्र आणि घट उठवणे आणि दसरा हा एकत्र एकाच दिवशी आलेत. 11 तारखेला अष्टमीचा आणि नवमीचा उपवास आणि 12 तारखेला नवमीचा उपवासाचे पारणे करायचे आहे, असं ज्योतिषशास्त्री राहुल कदम सांगतात.

advertisement

घट कसा उठावावा? शास्त्र काय सांगत

घट उठवताना शास्त्रात काही नियम सांगितले आहेत. नवमीला घट उठवून आपल्या कुलदेवतेला अभिषेक करावा. त्यानंतर जो टाक असेल त्याच्यावरती श्री सूक्ताने अभिषेक करून कुंकूमार्चन करावं आणि त्याची देव्हाऱ्यावरती स्थापना करावी. स्थापना केल्यानंतर महानैवेद्य दाखवून आपल्या उपवासाचे पारणे करून घ्यावे, असं ज्योतिषशास्त्री राहुल कदम यांनी सांगितले.

advertisement

यंदाचा दसऱ्याचा विजय मुहूर्त कधी?

शारदीय नवरात्रोत्सवाच्या दशमी तिथीला विजयादशमी दसरा असं म्हटलं गेलं आहे. हा मुहूर्त अत्यंत शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असलेल्या या दसऱ्या दिवशी नवीन कार्याची सुरुवात केली जाते. तसेच नवीन वास्तू खरेदी, वाहन खरेदी किंवा नव्या काही गोष्टींची सुरुवात करायची असेल तर हा मुहूर्त अत्यंत शुभ मानला जातो. यंदाचा दसऱ्याचा जो विजय मुहूर्त आहे तो यावेळी दुपारी 02:22 ते 03:09 वाजेपर्यंत आहे. विजय मुहूर्त साधता आला तर साधून घ्यावा.

अन्यथा सकाळी 11 नंतर संध्याकाळपर्यंत दसऱ्याचा शुभ दिवस असल्यामुळे नवीन शुभ कार्याला सुरुवात करायला हरकत नाही. आपण आपल्या नवीन कार्याची सुरुवात साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण असलेल्या या मुहूर्तावरती करू शकता. जसे की नवीन वास्तू खरेदी करायची असेल, नवीन वाहन खरेदी करायचे असेल, नवीन काही गोष्टींना सुरुवात करायची असेल, शेअर्स खरेदी करायचे असतील किंवा दागिने खरेदी करायचे असतील, नवीन उद्योगाची बोलणी करायची असतील तर तुम्ही या शुभमुहूर्तावरती बोलणीला सुरुवात करू शकता. साहजिक आहे की विजय मुहूर्त हा थोड्या कालावधी करता आहे, मात्र या विजय मुहूर्ताला बऱ्याच गोष्टी काही जणांना साधता येत नाहीत तर त्यामुळे दुःखी न होता दिवसभरात तुम्ही कधीही विजयादशमीचा मुहूर्त साधू शकता, असं ज्योतिषशास्त्री राहुल कदम यांनी सांगितले.

खंडे नवमीच्या व्रतासाठी काय करावे ?

महानवमीच्या म्हणजेच खंडे नवमीच्या या दिवशी महिषासुराचा वधाचा दिवस मानला जातो. या दिवशी उपवास करणे आणि कन्या पूजा करणे या प्रथा आहेतच पण महानवमीच्या दिवशी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी आणि घरांमधील आयुध, शस्त्रं, यंत्रसामग्री आणि इतर अनेक वस्तूंचे पूजन करून त्यांचा सन्मान केला जातो. दसरा हा अधर्मावर धर्माचा आणि असत्यावर सत्याचा विजय म्हणून साजरा केला जातो.

या दिवसाशी संबंधित वेगवेगळ्या प्रथा आपणास दिसून येतात, रामाच्या रावणावर ती विजया प्रित्यर्थ रावणाच्या पुतळ्याचे दहन काही ठिकाणी केले जाते तर महाभारतातील अर्जुनाच्या संबंधित गोष्टी नुसार शमीच्या पानांची पूजन केले जाते तर आपट्यांची पाने सोने म्हणून वाटली जातात. याव्यतिरिक्त या दिवशी शाळेत पहिला प्रवेश घेऊन पाटिवरती देवी सरस्वतीची आकृती काढून तिचे पूजन केले जाते. भारतामध्ये विविध प्रांतात दसरा तिथल्या संस्कृतीनुसार धामधुमीत साजरा केला जात असल्याचे दिसून येते, असंही ज्योतिषशास्त्री राहुल कदम यांनी सांगितले.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पान सेंटरने पालटलं नशीब, महिन्याला अडीच लाख उलाढाल, सांगितला यशाचा फॉर्म्युला
सर्व पहा

सूचना: इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.

मराठी बातम्या/अध्यात्म/
यंदाच्या नवरात्रीच्या तिथी मध्ये मोठा बदल! उपवासाचे उत्थापन कधी करावं? घट कधी उठवावेत? पाहा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल