Sankashti Chaturthi 2025: शुक्रवारी संकष्टीच्या पूजेसाठी हा शुभ मुहूर्त चुकवू नका; बाप्पाची कृपा निरंतर राहील
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Sankashti Chaturthi 2025: आश्विन महिन्यातील संकष्टी चतुर्थी खास असणार आहे. संकष्टी १० ऑक्टोबर रोजी आहे. विशेष म्हणजे या दिवशी सिद्ध योग देखील जुळून येत आहे, ज्यामुळे या दिवसाचे महत्त्व अधिक वाढलंय.
मुंबई : हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थी व्रताला विशेष महत्त्व आहे. वैदिक पंचांगानुसार, दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाते. हे व्रत विघ्नहर्ता श्री गणरायाला समर्पित आहे. महाराष्ट्रभरात लाडक्या गणरायाची या दिवशी मनोभावे पूजा केली जाते. गणेश मंदिरामध्ये या दिवशी भाविकांची गर्दी जमते.
या दिवशी, मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि घरात सुख-समृद्धी नांदावी यासाठी प्रथम पूजनीय श्री गणरायाची विशेष पूजा केली जाते. तसेच, संकष्टी चतुर्थीच्या व्रतामध्ये श्री गणेशासोबतच चंद्रदेवतेच्या पूजेचीही प्रथा आहे. आश्विन महिन्यातील संकष्टी चतुर्थी खास असणार आहे. संकष्टी १० ऑक्टोबर रोजी आहे. विशेष म्हणजे या दिवशी सिद्ध योग देखील जुळून येत आहे, ज्यामुळे या दिवसाचे महत्त्व अधिक वाढलंय.
advertisement
संकष्टी चतुर्थी तिथी २०२५ - वैदिक पंचांगानुसार, आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी ९ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजून ५४ मिनिटांनी सुरू होईल. या तिथीची समाप्ती १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजून ३८ मिनिटांनी होईल. त्यामुळे, उदय तिथीनुसार संकष्टी चतुर्थीचे व्रत १० ऑक्टोबर रोजी केले जाईल. चंद्रोदय रात्री ८.५३ वाजता होणार आहे.
advertisement
संकष्टी चतुर्थी शुभ मुहूर्त २०२५ - संकष्टी चतुर्थीसाठी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी ११ वाजून ४४ मिनिटांपासून ते दुपारी १२ वाजून ३१ मिनिटांपर्यंत राहील. या वेळेत तुम्ही पूजा करू शकता. यासोबतच, संकष्टी चतुर्थीला कृत्तिका नक्षत्र जुळून येत आहे, ते सायंकाळी ५ वाजून ३१ मिनिटांपर्यंत राहील. तसेच, सिद्ध योग सायंकाळी ५ वाजून ४१ मिनिटांपर्यंत राहणार आहे.
advertisement
श्री गणेशाची आरती
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची।
नूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची।
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची।
कंठी झळके माळ मुक्ताफळांची॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती।
दर्शनमात्रे मन कामना पुरती॥
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा।
चंदनाची उटी कुमकुम केशरा।
advertisement
हिरेजडित मुकुट शोभतो बरा।
रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती।
दर्शनमात्रे मन कामना पुरती॥
लंबोदर पीतांबर फणिवरबंधना।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना।
दास रामाचा वाट पाहे सदना।
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती।
दर्शनमात्रे मन कामना पुरती॥
-------------
शेंदूर लाल चढायो अच्छा गजमुखको।
advertisement
दोंदिल लाल बिराजे सूत गौरी हरको।
हाथ लिए गुडलड्डू साई सुरवरको।
महिमा कहे न जाय लागत हूँ पदको॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती।
दर्शनमात्रे मन कामना पुरती॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती।
दर्शनमात्रे मन कामना पुरती॥
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 09, 2025 8:10 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Sankashti Chaturthi 2025: शुक्रवारी संकष्टीच्या पूजेसाठी हा शुभ मुहूर्त चुकवू नका; बाप्पाची कृपा निरंतर राहील