प्रथम पूज्य देव, श्री गणेशाला विघ्नहर्ता देखील म्हटलं जातं. गणेशाच्या कृपेनं भक्तांची संकटे आणि अडचणी दूर होतात. गणेशाला बुद्धी आणि ज्ञानाची देवता म्हणतात. हत्तीचे डोके असल्यामुळे त्याला गजानन असेही म्हणतात आणि त्याच्या मोठ्या पोटामुळे त्याला लंबोदर म्हणतात. गणपतीच्या दोन आरत्या सर्वाधिक लोकप्रिय आहेत. पहिली ‘जय गणेश, जय गणेश, जय गणेश देवा’ आणि दुसरी मराठी वंदना म्हणजे ‘सुखकर्ता दुःखहर्ता, वार्ता विघ्नांची’. या दोन्ही आरत्यांची रचना छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु समर्थ रामदास यांनी केली होती. खरे तर, पुण्यातील आठ गणेश मंदिरांचा समावेश असलेल्या अष्टविनायक तीर्थक्षेत्राचे मुख्य मंदिर असलेल्या मोरगाव मंदिरात मयूरेश्वर हे गणेशाचे रूप पाहून समर्थ रामदासांना आरती लिहिण्याची प्रेरणा मिळाली.
advertisement
कशी लिहिली गेली?
समर्थ रामदासांनी मयुरेश्वरांना डोळ्यासमोर ठेवून दोन्ही भाषांमध्ये आरत्या लिहिल्या होत्या. त्यांनी लिहिलेल्या मराठी आरतीचा राग जोगियामध्ये आहे. श्रीगणेशाच्या आरतीचा उद्देश अडथळे दूर करणारी भक्ती व्यक्त करणे हा आहे. दोन्ही आरत्या ही भक्तांची त्यांच्या धर्माप्रती असलेली भक्ती दाखवण्याचे एक साधन आहे. गणेश चतुर्थीपासून 11 दिवस लंबोदर आपल्या सोबत राहतो. असे मानले जाते की, जेव्हा विघ्नहर्ता 11 दिवसांचा पाहुणा बनून निघून जातो तेव्हा तो भक्तांचे सर्व त्रास सोबत घेऊन जातो.
PHOTOS : जंगलात आहे सहाव्या शतकातील अनोखे मंदिर, वर्षातून फक्त एकदा होते पूजा
समर्थ रामदास कोण होते -
श्रीगणेशाची आरती लिहिणाऱ्या समर्थ रामदासांचे खरे नाव नारायण सूर्याजीपंत कुलकर्णी होते. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील जांब येथे 1606 मध्ये झाला. समर्थ रामदासांच्या वडिलांचे नाव सूर्याजी पंत होते. त्यांची आई राणूबाई या संत एकनाथांच्या घराण्यातील होत्या. गंगाधर स्वामी हे समर्थ रामदासांचे थोरले बंधू होते. त्यांनी ‘सुगमोपाया’ हा ग्रंथ रचला होता. समर्थ रामदासांनी तरुणांना सुदृढ आणि दणकट अंगयष्टीतून राष्ट्राच्या विकासाची शिकवण दिली. त्यांनी लोकांना व्यायाम करण्याचा सल्ला दिला आणि हनुमानाच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली. भारताच्या दौऱ्यात त्यांनी अनेक ठिकाणी हनुमानाच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली. देशात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी त्यांनी ठिकठिकाणी मठ बांधले.
गणेशोत्सवात राशींनुसार करा मंत्रांचा जप, सुखाची होईल सुरुवात
समर्थ रामदासांनी 90 आरत्या लिहिल्या -
समर्थ रामदासांनी दासबोध, आत्माराम, मनोबोध असे अनेक ग्रंथ लिहिले. त्यांनी लिहिलेल्या 90 हून अधिक आरत्या कित्येक वर्षांपासून गायल्या जातात. त्यांनी शेकडो अभंगही लिहिले आहेत. समकालीन समाजाची स्थिती लक्षात घेऊन समर्थ रामदासांनी आपल्या ग्रंथात राजकारण, प्रशासन इत्यादी अनेक विषयांवर मार्गदर्शन केले आहे. समर्थ रामदासांनी देवी-देवतांची 100 हून अधिक स्तोत्रेही सोप्या शब्दात लिहिली आहेत. भक्ती आणि प्रेमासोबतच त्यांच्या स्तोत्रांमध्ये आणि आरतींमध्ये वीरताही दिसून येते. आत्माराम, मनपंचक, पंचीकरण, चतुर्थमान, बाग प्रकरण, स्फुट अभंग ही समर्थ रामदासांची रचना आहे. बहुतेक रचना मराठीच्या 'ओवी' श्लोकात आहेत. महाराष्ट्राचे संत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरू समर्थ रामदास यांनी 1682 मध्ये अखेरचा श्वास घेतला.
मंदिरांचं गाव, ज्याठिकाणी आहेत तब्बल 265 मंदिरे; हनुमानाच्या तब्बल 11 मूर्ती
गणेशोत्सवाची सुरुवात कशी झाली?
महाराष्ट्रात गणेशोत्सवाची सुरुवात पुण्यातून झाली. मुघल राजवटीत सनातन संस्कृती वाचवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या मातोश्री जिजाबाई यांच्यासोबत गणेश चतुर्थीपासून गणेश उत्सव सुरू केल्याचे सांगितले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी गणेशोत्सव सुरू केल्यानंतर मराठा साम्राज्यातील इतर पेशव्यांनीही गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. गणेश चतुर्थीच्या वेळी मराठा पेशवे ब्राह्मणांना भोजन पुरवत असत. पेशवाईनंतर ब्रिटीश राजवटीने भारतात सर्व हिंदू सणांवर बंदी घातली. त्यानंतर बाळ गंगाधर टिळकांनी पुन्हा गणेश चतुर्थीचा उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली.