PHOTOS : जंगलात आहे सहाव्या शतकातील अनोखे मंदिर, वर्षातून फक्त एकदा होते पूजा
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
भारतामध्ये अनेक मंदिरे आहेत. त्यात भारतातील उत्तराखंड राज्याला देवभूमी म्हटले जाते. याच देवभूमीमध्ये एक अनोखे असे मंदिर आहे. सहाव्या शतकात हे मंदिर तयार करण्यात आले होते. या मंदिरात वर्षातून फक्त एकदा पूजा केली जाते, असे सांगितले जाते. नेमका या मंदिराचा इतिहास काय आहे, हे जाणून घेऊयात. (सोनिया मिश्रा, प्रतिनिधी)
उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात अनेक मंदिरे आहेत. या मंदिरांची अशी स्वतःची श्रद्धा आहे. वर्षभर ही मंदिरे भाविकांसाठी खुली असतात. मात्र, या सर्वांमध्ये एक मंदिर असे आहे, जिथे वर्षभरात फक्त रक्षाबंधनाच्या दिवशीच विशेष पूजेचे आयोजन केले जाते. रक्षाबंधनाच्या दिवशी या मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळतात.
advertisement
advertisement
या परिसरातील भाविक याठिकाणी देवाला रक्षासूत्र बांधतात आणि सण साजरा करतात. स्कंदपुराण, पद्मपुराण आणि श्रीमद् भागवत कथेनुसार, भगवान विष्णूने येथे वामन अवतार घेतला होता आणि तीन पग (पाऊल) मध्ये राजा बलीकडे दक्षिणेत तिन्ही लोकांना मागितले आणि त्यांना पाताळात पाठवले होते. त्यामुळे राजा बळीचा अहंकार धुळीस मिळाला, असे सांगितले जाते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement