TRENDING:

Shukrawar Upay: शुक्रवारी या गोष्टी केल्यानं माता लक्ष्मी होते प्रसन्न; सुख-समृद्धीसोबत कुंटुंबाची होते भरभराट

Last Updated:

Shukrawar Upay: शुक्रवारी कोणते उपाय केल्यानं आर्थिक समस्या दूर होऊ शकतात, याविषयी ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार डॉ. कृष्णकुमार भार्गव यांच्याकडून जाणून घेणार आहोत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 29 सप्टेंबर : ज्योतिषशास्त्रात शुक्रवार हा महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, धन आकर्षित करण्यासाठी आणि व्यवसाय सुरू करण्याचा शुभ दिवस मानला जातो. शुक्रवारचा स्वामी शुक्र आहे, जो विलासी जीवन, प्रेम आणि रोमान्सचा स्वामी मानला जातो. ज्यांच्या कुंडलीत शुक्र ग्रह उच्च किंवा सकारात्मक स्थिती आहे, त्यांच्यासाठी हा दिवस अत्यंत भाग्यवान आहे. शुभ शुक्र व्यक्तीला सर्व सुखसोयी आणि ऐषोआराम देतो, तर वाईट शुक्र व्यक्तीला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करू शकतो. हिंदू धर्मात शुक्रवार हा दिवस लक्ष्मीचा दिवस मानला जातो.
शुक्रवारी करण्याचे उपाय
शुक्रवारी करण्याचे उपाय
advertisement

असे मानले जाते की, माता लक्ष्मीच्या कृपेनेच मनुष्याला धनाची प्राप्ती होते. यामुळेच माता लक्ष्मीला संपत्ती आणि ऐश्वर्याची देवी म्हटले जाते. शुक्रवारी पूर्ण विधीपूर्वक व्रत आणि पूजा केल्यानं देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन सर्व समस्या दूर करते. या दिवशी पूजेसोबत काही उपाय केले तर आपल्या जीवनात कधीही पैशाची तंगी भासणार नाही. शुक्रवारी कोणते उपाय केल्यानं आर्थिक समस्या दूर होऊ शकतात, याविषयी ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार डॉ. कृष्णकुमार भार्गव यांच्याकडून जाणून घेणार आहोत.

advertisement

- शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करण्याचे विशेष महत्त्व मानले जाते. या दिवशी, “ओम शुम शुक्राय नमः” किंवा “ॐ हिमकुन्दमृणालाभं दैत्यानां परमं गुरुम् सर्वशास्त्रप्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहं” या मंत्रांचा अवश्य जप करा. याशिवाय मंदिरात जाऊन देवी लक्ष्मीला श्रृंगाराच्या वस्तू अर्पण केल्यानं नशीब बलवत्तर होतं. शुक्रवारी लक्ष्मीला लाल वस्त्र, बिंदी, सिंदूर, चुनरी आणि बांगड्या अर्पण करणे खूप शुभ मानले जाते.

advertisement

सूर्यग्रहणानंतर 15 दिवसात चंद्रग्रहण! या राशीच्या लोकांना नशिबाची मिळणार साथ

- शुक्रवारी लक्ष्मी देवीच्या पूजेच्या वेळी शुद्ध तुपाचा दिवा लावणे शुभ मानले जाते. शुक्रवारी मुंग्या आणि गायींना पीठ खाऊ घातल्याने सौभाग्य प्राप्त होते. धनाची देवी लक्ष्मीला पांढरा रंग खूप आवडतो. या दिवशी पूजेनंतर पांढऱ्या वस्तूंचे दान केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. यामुळे जीवनात आनंद आणि समृद्धी येते. साखर, पांढरे वस्त्र, कापूर, दूध, दही इत्यादी पांढर्‍या वस्तूंचे शुक्रवारी दान करावे.

advertisement

- शुक्रवारी विधीनुसार श्रीयंत्राची पूजा करणे शुभ मानले जाते. यामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होते, असे मानले जाते. शुक्रवारी लक्ष्मीला मोगरा अत्तर अर्पण करावे. कामात प्रगती होण्यासाठी गुलाबाचा अत्तर अर्पण करतात. देवी लक्ष्मीला कवड्याचे अत्तर अर्पण केल्याने मानसिक शांती मिळते. चंदनाचा अत्तर अर्पण केल्याने सौभाग्य वाढते. रोज घरात अत्तर वापरल्यानं काम आणि व्यवसायात वाढ होते.

advertisement

पितृपक्षात कावळा अशा पद्धतीनं देतो शुभ-अशुभ संकेत, पूर्वज अतृप्त असतील तर..?

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/अध्यात्म/
Shukrawar Upay: शुक्रवारी या गोष्टी केल्यानं माता लक्ष्मी होते प्रसन्न; सुख-समृद्धीसोबत कुंटुंबाची होते भरभराट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल