TRENDING:

नवरात्रीत अनवाणी पायाने का चालतात? जाणून घ्या काय आहे कारण?

Last Updated:

नवरात्रीच्या काळात अनेकजण अनवाणी पायाने चालतात. यामागचं नेमकं कारण काय माहितीये का?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
वर्धा, 1 ऑक्टोबर: नवरात्री म्हणजे आदिमाया, आदिशक्तीच्या उपासनेचे दिवस. या दिवसात अनेक जण आपल्याला अनवाणी पायाने चालताना दिसतात. म्हणजेच नवरात्रीतील नऊ दिवस पायात चप्पल घालत नाहीत. त्या मागचे नेमके कारण काय आहे? त्यामागे भक्ती भाव, नवस, धार्मिक श्रद्धा असते. मात्र त्यामागे काही शास्त्रीय कारण आहे का? याबाबत वर्धा येथील ज्योतिष अभ्यासक डॉ ज्योतिर्वेद भूषण यांनी माहिती दिली आहे.
advertisement

काय सांगतात अभयासक ?

नवरात्रीत अनेकजण अनवाणी पायाने चालतात. ही पद्धत पूर्वीच्या काळापासून चालत असलेली दिसते. पूर्वीच्या काळात पादत्राणे किंवा जोडे हे चामड्यापासून बनवले जायचे. म्हणजेच एखाद्या प्राण्याची हत्या करून चप्पल तयार व्हायच्या. त्यामुळे नवरात्रीच्या नऊ दिवस तरी आपण चप्पल न घालून प्राण्यांची हिंसा किंवा हत्या थांबविण्यासाठी, प्राण्याला न मारण्यासाठी एकप्रकारे मदत करू शकतो. हा अनवाणी चालण्याचा उद्देश असू शकतो, असे भूषण सांगतात.

advertisement

शारदीय नवरात्र म्हणजे काय? कसे असते नवरात्रीतील उपवासाचे व्रत ?

हाही असू शकतो तर्क

तसेच आपलं शरीर हे विविध चक्र आणि ऊर्जा यांच्यापासून तयार झालं आहे. पायांशी संबंधित स्वाधिष्टीन आणि मुलाधार चक्र असतात. पायांचा संपर्क हा मातीशी आणि पृथ्वीच्या घटकांशी असतो. जेव्हा अनवाणी पायाने चालतो तेव्हा या दोन चक्राचा संबंध मातीच्या उर्जेशी येतो. त्यामुळे नवरात्रीतच्या नऊ दिवस आपली मातीशी नाळ कायम राहावी. पृथ्वीशी आपला संपर्क यावा, मातीचा स्पर्श व्हावा, हा त्यामागचा उद्देश असू शकतो, असंही ज्योतिर्वेद भूषण म्हणतात.

advertisement

नवरात्रीमध्ये का करतात कन्या पूजन ? काय आहे पौराणिक महत्त्व?

नवरात्रीत भरा देवीची ओटी

नवरात्री हा सगळीकडे नवचैतन्य निर्माण करणारा एक सण आहे. नवरात्रीतील नऊ दिवस आई जगदंबेची उपासना केली जाते. आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी नवस देखील बोलला जातो. ठिकठिकाणी देवीआईची आराधना केली जाते. त्यातीलच एक म्हणजे अनवाणी पायाने चालणे. मात्र देवीआईला प्रसन्न करण्यासाठी नवरात्रीच्या नऊ दिवस कन्यापूजन करण्याचा सल्ला अभ्यासक देतात. तसेच या दिवसांत देवीची ओटी भरून तिची आराधना केल्यास देवी प्रसन्न होते, असेही सांगितले जाते.

advertisement

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/अध्यात्म/
नवरात्रीत अनवाणी पायाने का चालतात? जाणून घ्या काय आहे कारण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल