पितृ पक्षात नव्या वस्तू खरेदी करू नये असंही म्हटलं जातं. कपडे, सोनं, गाडी, घर यांची खरेदी करू नये असं मानलं जातं. तसंच नवं कामही सुरू करू नये असं म्हणतात. यामागे काही कारणं सांगितली जातात. असं मानलं जातं की पितृ पक्षावेळी पितरांचा आत्मा मृत्यू लोकात फिरतो. यामुळे पितरांना प्रसन्न करतील अशी कामं करायला हवी. श्राद्ध, पिंडदान, दान, पुण्य इत्यादी. पितृ पक्षात पितरांचा आदर व्यक्त करणं आणि आठवणींना उजाळा देणं या गोष्टी केल्या जातात. यामुळे पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि ते प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात असं शास्त्र सांगतं.
advertisement
जर व्यक्ती यावेळी शॉपिंग, नवं काम, सेलिब्रेशन यात वेळ घालवत असेल तर ते योग्य मानलं जात नाही. कारण हा काळ शोक व्यक्त करण्याचा अशी मान्यता आहे. पण अनेकांना माहिती नसेल, पितृपक्षातही एक दिवस असा आहे, जो सोनंखरेदीसाठी खरंतर शुभ मानला जातो.
पितृ पक्षाच्या 15 दिवसांमध्ये अष्टमी हा दिवस शुभ मानला जातो. पितृपक्षामध्ये येणाऱ्या अष्टमीला देवी लक्ष्मीचं वरदान प्राप्त आहे. या दिवशी हत्तीवर विराजमान लक्ष्मीची पूजा करणं लाभदायक ठरते. या दिवशी सोनं खरेदी करणं शुभ मानलं जाते. तसंच या दिवशी सोने खरेदी केल्याने ते आठ पट वाढतं, अशीही धार्मिक श्रद्धा आहे. लग्नाच्या खरेदीसाठी हा दिवस शुभ मानला जातो. यंदाच्या पितृपक्षातील अष्टमीचा हा दिवस 14 सप्टेंबर आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका.
Hotel Facts : हॉटेल रूममध्ये टूथब्रश बाथरूम नाही तिजोरीत ठेवा, विचित्र सल्ला, पण कारण शॉकिंग
(सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)