शुक्रवार हा देवी लक्ष्मीच्या पूजेसाठी समर्पित आहे. या दिवशी योग्य विधींनी लक्ष्मीची पूजा करावी. ज्या व्यक्तीला आयुष्यात धन कमवायचे आहे त्याने देवी लक्ष्मीचा आश्रय घ्यावा. देवी लक्ष्मीची पूजा कराल तेव्हा नेहमी पांढरे किंवा गुलाबी रंगाचे कपडे घाला. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही श्रीसूक्ताचे पठण करू शकता आणि ११ दिवे लावून तिची पूजा देखील करू शकता. हा उपाय केल्याने तुम्हाला माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळेल.
advertisement
कन्या पूजा - लहान मुलींना माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. मूर्तीमध्ये स्थापित देवीला तुम्ही प्रसन्न करा किंवा न करा, पण घरातील लहान मुलींना नेहमी आनंदी ठेवावे. लहान मुलींना खाऊ घालून त्यांना आनंदी केले पाहिजे. जेवणानंतर त्यांची पूजा करा आणि त्यांना दक्षिणा द्या. मुलीला पांढरे किंवा गुलाबी कपडे घाला आणि जय माता लक्ष्मीचा जप करा. असे मानले जाते की या उपायाने देवी लक्ष्मी लवकरच प्रसन्न होते.
ही तर बिकट काळाची सुरुवात! या राशीला पुढं आणखी सोसावं लागणार, संकटे
तुम्ही बऱ्याच काळापासून आर्थिक संकटाचा सामना करत असाल किंवा तुम्ही पैसे वाचवू शकत नसाल आणि तुमचे खर्च जास्त असतील तर तुम्ही हा उपाय अवलंबू शकता. ज्या चांदीच्या नाण्यावर श्री यंत्र किंवा लक्ष्मीचे चित्र कोरलेले असेल ते लाल किंवा पांढऱ्या कापडात गुंडाळा आणि तुमच्या तिजोरीत ठेवा. या उपायाचा अवलंब केल्याने पैसे वाचतील आणि पैसेही मिळत राहतील.
शनिच्या राशीत राहु गोचर! झटक्यात बदलून जाणार या 5 राशींचे नशीब, अच्छे दिन
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)