TRENDING:

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी वारी चुकली? दहिसरमधील प्रति पंढरपूरला द्या भेट, विठोबाच्या दर्शनाचीच होईल अनुभूती, Video

Last Updated:

Ashadhi Ekadashi 2025: मुंबईकरांसाठी आता पंढरपूरचा आध्यात्मिक अनुभव अगदी काही मिनिटांच्या अंतरावर मिळू शकतो. हे मंदिर पाहिल्यावरच लक्षात येतं ही केवळ एक वास्तू नाही, तर पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनाचीच अनुभूती देणारी जागा आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुंबईकरांसाठी आता पंढरपूरचा आध्यात्मिक अनुभव अगदी काही मिनिटांच्या अंतरावर मिळू शकतो. दहिसर पूर्व स्टेशनपासून फक्त 10 मिनिटांवर असलेल्या आनंद नगरमध्ये वसलेलं श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर हे सध्या भक्तांच्या श्रद्धेचं आणि समाधानाचं स्थान ठरतं आहे. हे मंदिर पाहिल्यावरच लक्षात येतं ही केवळ एक वास्तू नाही, तर पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनाचीच अनुभूती देणारी जागा आहे.
advertisement

मंदिराचे वैशिष्ट्य:

पंढरपूरसारखी रचना

मंदिराची संपूर्ण रचना हुबेहूब पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासारखी आहे. विठोबाची उभी मूर्ती, समोर ठेवलेली पादुका, आणि रुक्मिणीमातेची शेजारी मूर्ती पाहताक्षणी भाविकांची नजर थांबते आणि मन विठ्ठलनामात हरवून जातं.

View More

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवास धरताय? पण ही चूक पडू शकते आरोग्यासाठी महाग

advertisement

गाभारा आणि तुळशी वृंदावन

मंदिराचा गाभारा मोठा, प्रशस्त आणि शांततेने भरलेला आहे. मंदिरात प्रवेश करताच सर्वप्रथम लक्ष वेधून घेतं ते म्हणजे सुशोभित तुळशी वृंदावन. जिथे भक्त तुळशीची प्रदक्षिणा घालतात, पाणी घालतात आणि संकल्प करतात. मंदिराच्या संपूर्ण परिसरात फुलांचा सुवास आणि मंत्रोच्चार ऐकायला मिळतो.

advertisement

 संतांच्या मूर्ती आणि वारकरी परंपरा

या मंदिरात संत तुकाराम, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांच्याही मूर्ती आहेत. त्यांच्या पाया पडताना भाविकांना एक वेगळीच ऊर्जा मिळते. येथे वारकरी संप्रदायाशी संबंधित भजन, हरिपाठ, नामस्मरणाचे कार्यक्रम नियमितपणे होतात.

आषाढी एकादशीची तयारी

यावर्षी आषाढी एकादशी 6 जुलै, रविवार रोजी साजरी होत आहे. त्यानिमित्ताने मंदिरात विशेष पूजा, अभिषेक, भजन-संध्या आणि महाप्रसादाचं आयोजन केलं जाणार आहे. स्थानिक नागरिक, वारकरी मंडळे आणि महिला मंडळे यामध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत.

advertisement

सजावट आणि भक्तांची गर्दी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गुळाची झाली भाव वाढ, केळी आणि आल्याची आज काय स्थिती? Video
सर्व पहा

मंदिर सध्या लाल-पिवळ्या झेंडूच्या फुलांनी सजवलेलं आहे. रोज शेकडो भाविक येथे दर्शनासाठी येत असून, पंढरपूरला न जाता मुंबईतच विठ्ठलाच्या चरणी डोळे टेकवण्याचा आनंद अनुभवत आहेत.

मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
Ashadhi Ekadashi 2025: आषाढी वारी चुकली? दहिसरमधील प्रति पंढरपूरला द्या भेट, विठोबाच्या दर्शनाचीच होईल अनुभूती, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल