पिंपरी-चिंचवडमधील संभाजीनगर येथील रामेश्वर महादेव मंदिराचा इतिहास अतिशय रंजक आहे. 1991 सालापर्यंत या परिसरात एकही मंदिर नव्हतं. मात्र काही स्थानिक रहिवाशांनी पुढाकार घेत, 1991 साली लोकसहभागातून या मंदिराची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून हे मंदिर नवसाला पावणारं मंदिर म्हणून नावारूपाला आलं आहे. भाविकांच्या म्हणण्यानुसार, इथे बोललेला नवस हमखास पूर्ण होतो.
advertisement
Aajache Rashibhavishya: धन लाभ होणार, कामे मार्गी लागतील, तुमच्या राशीचं आजचं राशिभविष्य काय?
या मंदिरात शिवपिंडीसह मारुतीची मूर्ती देखील स्थापित करण्यात आली आहे. श्रावण महिन्यात येथे सकाळ-संध्याकाळ आरती केली जाते, सुंदर फुलांची आरास होते आणि भाविकांसाठी प्रसादाचेही आयोजन केलं जातं. भाविकांचा श्रद्धेचा ठेवा इथं आजही जपला जातो. इथे केलेला नवस पूर्ण झाल्यावर अनेक जण दागिने, रोख रक्कम अशा स्वरूपात दान करतात, अशी माहिती मंदिरातील स्वयंसेवक चंद्रशेखर पाटील यांनी दिली.
इथे नवस केला की तो पूर्ण होतो. कोणाचं लग्न ठरतं, कोणाला नोकरी मिळते, तर कुणाचं घराचं स्वप्न साकार होतं. श्रावण महिन्यातच नाही, तर संपूर्ण वर्षभर येथे भक्तांची गर्दी पाहायला मिळते. या मंदिरात आलं की गाभाऱ्यातील दिव्यांची झगमग, फुलांची सजावट आणि 'ॐ नमः शिवाय चा सातत्याने होणारा जप मनाला शांतता आणि भक्तीची अनुभूती देतो, असं स्थानिक भाविक सांगतात.
महाशिवरात्र, हनुमान जयंती आणि श्रावण महिन्यातील सोमवार, शनिवार या दिवशी येथे विशेष गर्दी पाहायला मिळते. तुम्ही सुद्धा श्रावण महिन्यात रामेश्वर मंदिराला नक्की भेट द्या.
(सूचना : येथे दिलेली माहिती मंदिराचे स्वयंसेवक आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)