हा महानैवेद्य पुण्यातील प्रसिद्ध आंबेवाले देसाई बंधू यांच्या मंदार देसाई आणि त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने अर्पण करण्यात आला. पहाटेपासूनच मोठ्या संख्येने भाविकांनी मंदिरात गर्दी करून गणरायाचे दर्शन घेतले. अक्षयतृतीया निमित्ताने स्वराभिषेकाच्या माध्यमातून श्रीगणेशाच्या चरणी भक्तांनी सेवा अर्पण केली.
advertisement
अक्षय तृतीया निम्मित दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. गणपती बाप्पाचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला, तर रात्री भारतीय महिलांच्या वतीने भजन सादर करण्यात येणार आहे. हे बाप्पाचं रूप आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येत आहेत. पहाटे पासून भाविकांनी गर्दी केली आहे.
गणपती बाप्पाला अर्पण केलेला हा नैवेद्य दुसऱ्या दिवशी सामाजिक कार्यासाठी वापरण्यात येणार आहे. ससून रुग्णालयातील रुग्ण, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, अपंग निवास अशा ठिकाणी हा नैवेद्य वितरित केला जाणार असल्याची माहिती मंदिराचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी दिली.