बुरहानपूर : घरात कॅलेंडर असलं की वार कोणता आहे, तारीख कोणती आहे, हे व्यवस्थित लक्षात राहतं आणि कामं अगदी वेळापत्रकानुसार पार पडतात. शिवाय कोणता दिवस किती शुभ आहे, त्या दिवशी कोणती तिथी आहे हेसुद्धा आपण कॅलेंडरवर वाचू शकतो. वर्षानुसार आपण कॅलेंडर बदलतो. परंतु तुम्हाला माहितीये का, घर असो किेवा ऑफिस असो, कॅलेंडर योग्य दिशेत असेल तरच आपलं वर्ष सुखात जातं, मग त्यात जास्त शुभ दिवस नसतील तरीही. त्यामुळे कोणत्याही भाषेतलं असलं तरी कॅलेंडर योग्य दिशेतच लावायला हवं.
advertisement
कॅलेंडरचा आपल्या प्रगतीवर, आरोग्यावर परिणाम होतो. हा परिणाम शुभ असावा यासाठी काही गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॅलेंडरसाठी योग्य जागा निवडणं. जर तुम्ही चुकीच्या जागी कॅलेंडर लावलं तर त्याचा तुमच्या आयुष्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. 'कालचक्र बिंदू' पुस्तकात याबाबत माहिती दिलेली आहे. शिवाय वास्तूशास्त्रसुद्धा हेच सांगतं.
फेब्रुवारीत कोणाचं नशीब पालटणार, कोणते ग्रह चाल बदलणार? वैवाहिक जीवनात सुख येणार!
ज्योतिषी शैलेंद्र मुखिया यांनी सांगितलं की, घरात कायम सकारात्मक ऊर्जा असावी, घरातल्या सर्व व्यक्ती सुदृढ असाव्या, असं वाटत असेल तर कॅलेंडर पूर्व दिशेत लावावं. तरच आपण यशस्वी व्हाल. शिवाय वेळही तुम्हाला चांगली साथ देईल. कॅलेंडर जर उत्तर दिशेत लावलं तर घरात कधीच पैशांची कमतरता भासणार नाही. कॅलेंडर पश्चिम दिशेत असेल तर मुलांचं अभ्यासात व्यवस्थित मन लागेल परिक्षेत त्यांना चांगले गुण मिळतील. तर, दक्षिण दिशेत कॅलेंडर लावल्यास वर्षाच्या मध्यात आपल्याला आपल्या मेहनतीचं फळ मिळेल. परंतु यामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. शिवाय घरातल्या व्यक्ती आजारीही पडू शकतात. त्यामुळे चुकूनही या दिशेत कॅलेंडर लावू नये.
तुम्हीपण चप्पला घरात घेऊन जाता? ही सवय आजच बदला बरं, नाहीतर आणखी येतील अडचणी
शुभ मुहूर्तावर लावा कॅलेंडर
कॅलेंडर वर्षाच्या सुरूवातीला लावावं, मात्र ते नेमकं कधी लावलं गेलं पाहिजे याचीही वेळ चूकवू नये. कोणत्याही शुभ मुहूर्तावर आपण कॅलेंडर लावू शकता, तरच आपल्याला त्याचा फायदा मिळेल आणि घरात सुख, समृद्धी आणि समाधानाचं वातावरण नांदेल.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो… या लिंकवर क्लिक करा