TRENDING:

Eid Milad-un- Nabi 2024: ईद-ए-मिलाद म्हणजे काय? हा सण कसा साजरा केला जातो, पहा धार्मिक महत्त्व

Last Updated:

Eid Milad-un- Nabi 2024: या दिवशी मुस्लिम समाजात विशेष प्रार्थना, समारंभ आणि उत्सव आयोजित केले जातात. लोक मशिदींमध्ये प्रार्थना करण्यासाठी जातात आणि प्रेषित मुहम्मद यांच्या शिकवणींये स्मरण करतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : ईद मिलाद-उन-नबीला ईद-ए-मिलाद असेही म्हणतात. इस्लाम धर्मात ईद मिलाद-उन-नबी हा सण पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. ईद मिलाद-उन-नबी हा इस्लामिक कॅलेंडरचा तिसरा महिना, रबी अल-अव्वालच्या 12 तारखेला साजरा केला जाणारा एक विशेष इस्लामी सण आहे. या दिवशी मुस्लिम समाजात विशेष प्रार्थना, समारंभ आणि उत्सव आयोजित केले जातात. लोक मशिदींमध्ये प्रार्थना करण्यासाठी जातात आणि प्रेषित मुहम्मद यांच्या शिकवणींचे स्मरण करतात. 15 सप्टेंबरच्या संध्याकाळपासून 16 सप्टेंबरच्या संध्याकाळपर्यंत ईद मिलाद-उन-नबी साजरी केली जाईल.
News18
News18
advertisement

ईद मिलाद-उन-नबीचे महत्त्व -

इस्लाम धर्मात ईद मिलाद-उन-नबीचे महत्त्व खूप जास्त आहे. इस्लाम धर्माचे शेवटचे पैगंबर मानले जाणारे प्रेषित हजरत मुहम्मद साहिब यांच्या जन्मदिनानिमित्त हा सण साजरा केला जातो. तसेच, हा सण इस्लामी लोकांना एकात्मतेत बांधतो आणि त्यांना पैगंबरांच्या शिकवणी लक्षात ठेवण्यास प्रेरित करतो. याशिवाय हा सण मुस्लिम लोकांना समाजसेवेसाठी प्रेरित करतो आणि गरीब आणि गरजूंना मदत करण्यासाठी प्रोत्साहित करतो.

advertisement

या दिवशी रात्रभर प्रार्थना केली जाते आणि ठिकठिकाणी मिरवणुकाही काढल्या जातात. घरे आणि मशिदींमध्ये कुराण वाचले जाते. या दिवशी गरिबांना दानही केले जाते. ईद मिलाद-उन-नबीच्या दिवशी दान आणि जकात केल्याने अल्लाह प्रसन्न होतो, असे मानले जाते.

ईद मिलाद-उन-नबीचा इतिहास -

ईद मिलाद-उन-नबीचा इतिहास इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद साहिब यांच्या जन्माशी जोडलेला आहे. हजरत मुहम्मद साहिब यांचा जन्म मक्का येथे 570 मध्ये झाला. सुन्नी लोक 12 तारखेला रबी अल-अव्वाल रोजी प्रेषित मुहम्मद यांचा जन्म साजरा करतात, तर शिया लोक 17 तारखेला हा सण साजरा करतात. हा दिवस केवळ प्रेषित मुहम्मद यांचा जन्मच नव्हे तर त्यांच्या मृत्यूचा शोक म्हणूनही स्मरणात ठेवला जातो.

advertisement

Pitru Paksha 2024: पितृपक्षात पितरांसाठी हे शुभ काम केल्यास मिळेण विशेष आशीर्वाद

पैगंबर यांच्या जन्मापूर्वीच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. ते 6 वर्षांचे असताना त्यांच्या आईचेही निधन झाले. आपल्या आईच्या मृत्यूनंतर, पैगंबर मोहम्मद त्यांचे काका अबू तालिब आणि आजोबा अबू मुत्तलिब यांच्यासोबत राहू लागले. त्यांच्या वडिलांचे नाव अब्दुल्ला आणि आईचे नाव बीबी अमीना होते. अल्लाहने सर्वप्रथम प्रेषित हजरत मोहम्मद यांना पवित्र कुराण दिले. यानंतरच पैगंबरांनी पवित्र कुराणचा संदेश जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला, असे मानले जाते.

advertisement

मराठी बातम्या/अध्यात्म/
Eid Milad-un- Nabi 2024: ईद-ए-मिलाद म्हणजे काय? हा सण कसा साजरा केला जातो, पहा धार्मिक महत्त्व
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल