नर्मदापुरम : दरवर्षी माघ महिन्यातली कृष्ण पक्ष चतुर्थी 'सकट चौथ' म्हणून साजरी केली जाते. या दिवशी उपवास करून निरोगी आयुष्य आणि समृद्धीसाठी विधिवत पूजा केली जाते. बाप्पाच्या या पूजेमुळे आयुष्यातल्या सर्व अडचणी दूर होतात, अशी मान्यता आहे. विशेषतः आई आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी या दिवशी व्रत करते.
या माघ चतुर्थीला चंद्राला विशेष महत्त्व असतं. चंद्रदर्शनानंतरच या दिवसाचा उपवास सोडला जातो. असं म्हणतात की, या दिवशी केलेल्या उपवासामुळे आपल्या मुलांवरील सर्व संकटं दूर होऊन त्यांना सगळी सुखं मिळतात.
advertisement
फेब्रुवारीत तुमचंही पालटू शकतं नशीब, कदाचित होऊ शकतो भाग्योदय! यात तुमची रास आहे का पाहा
या चतुर्थीच्या पूजेत पानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. खरंतर सर्व पूजांमध्ये पानांचा वापर केला जातो. लक्ष्मी देवीला पान विशेष प्रिय असतात, त्यामुळे या चतुर्थीच्या दिवशी बाप्पाला पान अर्पण केल्यास लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळतो. त्यामुळे आपल्याला पैशांची कधीच कमी भासत नाही. ज्योतिषी पंकज पाठक यांनी याबाबात माहिती दिली आहे.
साधंसुधं रत्न नाही, साक्षात सूर्याला करतं प्रसन्न! वापरलंत तर आयुष्यात होईल लखलखाट
कशी कराल पूजा?
या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर आंघोळ करावी. स्वच्छ वस्त्र परिधान करून बाप्पाला फूल, दुर्वा, लाडू अर्पण करावे. मनोमनी ‘ॐ गणपतए नमः’ हा मंत्राचा जप करावा. पुन्हा सूर्यास्तानंतर आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. बाप्पाच्या मूर्तीजवळ एक पाण्याने भरलेला कलश ठेवावा. त्यानंतर धूपबत्ती लावून बाप्पाला नैवेद्य, तीळ, गूळ, लाडू आणि तूप अर्पण करावं. रात्री चंद्रदर्शनाने आपण उपवास सोडू शकता.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो… या लिंकवर क्लिक करा