TRENDING:

नेत्याच्या मुलासोबत भिडला, एका रात्रीत टीम इंडियातून गायब झाला स्टार क्रिकेटर, 24 तासात करिअर उद्ध्वस्त!

Last Updated:

सिडनीमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना प्रतिकूल परिस्थितीमध्येही ड्रॉ केला, या सामन्यात टीम इंडियाचा हिरो ठरलेला खेळाडू अचानक गायब झाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आज अशा खेळाडूचा वाढदिवस आहे ज्याला एकेकाळी टीम इंडियाची भविष्यातील 'भिंत' म्हणून ओळखलं जायचं, पण आता हा खेळाडू क्रिकेटमधूनच गायब झाला आहे. 13 ऑक्टोबर 1993 ला आंध्र प्रदेशच्या काकिंडामध्ये जन्मलेला हनुमा विहारी 32वा वाढदिवस साजरा करत आहे.
नेत्याच्या मुलासोबत भिडला, एका रात्रीत टीम इंडियातून गायब झाला स्टार क्रिकेटर, 24 तासात करिअर उद्ध्वस्त!
नेत्याच्या मुलासोबत भिडला, एका रात्रीत टीम इंडियातून गायब झाला स्टार क्रिकेटर, 24 तासात करिअर उद्ध्वस्त!
advertisement

2022 मध्ये खेळला शेवटचा सामना

स्थानिक क्रिकेटमध्ये बऱ्याच रन केल्यानंतर हनुमा विहारीची 2018 मध्ये भारताच्या टेस्ट टीममध्ये निवड झाली. मजबूत तंत्रज्ञान आणि क्रीजवर ठामपणे उभे राहण्याच्या क्षमतेमुळे हनुमा विहारीकडे राहुल द्रविडचा उत्तराधिकारी म्हणून पाहिलं गेलं. 2021 च्या सिडनी टेस्टमध्ये हनुमा विहारीची बॅटिंग कोणताच भारतीय क्रिकेटपटू विसरू शकणार नाही. टीम इंडिया पराभवाच्या संकटात होती, तेव्हा हॅमस्ट्रिंग दुखापतीने झुंजत असलेल्या हनुमा विहारीने दिवसभर बॅटिंग करून भारताला पराभवापासून वाचवलं, पण 2022 पासून हनुमा विहारी टीमबाहेर आहे.

advertisement

नेत्याच्या मुलासोबत पंगा महाग पडला?

2024 मध्ये रणजी ट्रॉफी सामन्यानंतर हनुमा विहारीने आंध्र प्रदेश क्रिकेट असोसिएशनवर गंभीर आरोप केले. त्याने सोशल मीडियावर कर्णधारपद सोडण्यासाठी दबाव आणल्याबद्दलची पोस्ट शेअर केली. एका सामन्यादरम्यान टीममधील सहकारी पारुध्वी राजवर हनुमा विहारी ओरडला, त्यानंतर पारुध्वीने त्याचे वडील आणि वायएसआर काँग्रेस पक्षाच्या नेत्याच्या वडिलांनी आपल्याला कर्णधारपदावरून काढून टाकले, असा आरोप हनुमा विहारीने केला.

advertisement

हनुमा विहारीने त्याच्या समर्थनार्थ 15 खेळाडूंनी स्वाक्षरी केलेले पत्र सोशल मीडियावर अपलोड केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राज्य क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांसोबत पंगा घेणे, हनुमा विहारीला महागात पडले. त्यानंतर, हनुमा विहारीची कधीच इंडिया ए मध्येही निवड झाली नाही, एवढंच नाही तर त्याच्या नावाचीही चर्चा झाली नाही.

2012 मध्ये जिंकला अंडर-19 वर्ल्ड कप

हनुमा विहारीने 2010 मध्ये हैदराबादकडून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली, पण 2016 मध्ये तो शेजारच्या आंध्र प्रदेशात गेला. दीर्घ संघर्षानंतर, 2017 मध्ये त्याची इंडिया ए मध्ये पहिल्यांदाच निवड झाली. 2012 मध्ये उन्मुक्त चंदच्या नेतृत्वात टीम इंडियाने अंडर-19 वर्ल्ड कप जिंकला, तेव्हा हनुमा विहारी त्या टीममध्ये होता. एमएसके प्रसाद निवड समितीचे प्रमुख झाल्यानंतर हनुमा विहारीची भारतीय टेस्ट टीममध्ये निवड झाली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दिवाळीला बनवा घरच्या घरी सुगंधित दिवे, अगदी झटपट होतील तयार,संपूर्ण Making Video
सर्व पहा

हनुमा विहारीने भारताकडून 16 टेस्टमध्ये 33.56 च्या सरासरीने 839 रन केले, ज्यात एक शतक आणि 5 अर्धशतकांचा समावेश होता. 2018 साली हनुमा विहारीचं इंग्लंडविरुद्धच्या टेस्टमधून टीम इंडियात पदार्पण झालं, तर 2022 साली इंग्लंडविरुद्धच विहारी शेवटची टेस्ट खेळला.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
नेत्याच्या मुलासोबत भिडला, एका रात्रीत टीम इंडियातून गायब झाला स्टार क्रिकेटर, 24 तासात करिअर उद्ध्वस्त!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल