तिसऱ्या टी-20 सामन्यात पहिले बॉलिंग करणाऱ्या टीम इंडियाने पहिल्या ओव्हरपासूनच दक्षिण आफ्रिकेला धक्के दिले, त्यामुळे त्यांचा 117 रनवरच ऑलआऊट झाला, यानंतर भारताने हा सामना 7 विकेटने जिंकला. याआधी झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय बॉलर्सनी तब्बल 22 एक्स्ट्रा रन दिल्या होत्या, त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने 213 रनपर्यंत मजल मारली आणि भारताला हा सामना गमवावा लागला.
advertisement
बॉलरनी अशाप्राकरे कमबॅक केलं, याचा मला आनंद आहे, असं मॉर्ने मॉर्कल म्हणाला. बीसीसीआयने मॉर्कलच्या मुलाखतीचा व्हिडिओ शेअर केला आहे.
अर्शदीपने माफी का मागितली?
अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराहने दुसऱ्या टी-20 सामन्यात 8 ओव्हरमध्ये 99 रन दिले होते. बुमराह वैयक्तिक कारणांमुळे रविवारची मॅच खेळू शकला नाही, त्यामुळे त्याच्याऐवजी हर्षित राणा टीममध्ये आला. राणा आणि अर्शदीपने 2-2 विकेट घेतल्या. 'मागच्या मॅचमध्ये मी वाईड बॉल टाकले, कॅमेरा सारखा कोच मॉर्कलच्या चेहऱ्यावर जात होता, जसं काय त्याने मला चुकीचा प्लान सांगितला होता. मी मॉर्नीची माफी मागतो, तसंच कॅमेरा त्याच्या चेहऱ्यावर जाऊ नये, हे मी लक्षात ठेवेन', असं अर्शदीप सिंग म्हणाला आहे.
दुसरीकडे अर्शदीप सिंगसोबत बॉलिंग करणं मला आवडतं, असं हर्षित राणा या व्हिडिओमध्ये म्हणाला आहे. अर्शदीप एका बाजूने दबाव बनवतो, त्यामुळे मला मदत मिळते. धर्मशालाची माझी पहिलीच मॅच होती, बॉलिंग करून चांगलं वाटलं. हवामानानेही माझी मदत केली, अशी प्रतिक्रिया हर्षित राणाने दिली आहे.
