TRENDING:

Team India : द्रविडशी पंगा, रोहितचंही ऐकलं नाही, टीमबाहेर काढलेल्या स्टारचा गिलच्या जागेवर दावा!

Last Updated:

मागच्या 18 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकही अर्धशतक न झळकावलेल्या शुभमन गिलचा फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय बनला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मागच्या 18 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकही अर्धशतक न झळकावलेल्या शुभमन गिलचा फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय बनला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात गिलने 28 बॉलमध्ये 28 रन केले. 7 फेब्रुवारीपासून भारतात टी-20 वर्ल्ड कप सुरू होत आहे, त्याआधी टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 आणि न्यूझीलंडविरुद्ध 5 टी-20 अशा एकूण 7 मॅच खेळणार आहे, त्यातच शुभमन गिलचा फॉर्म बघता त्याला टी-20 वर्ल्ड कपच्या टीममध्ये निवडायचं का नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
द्रविडशी पंगा, रोहितचंही ऐकलं नाही, टीमबाहेर काढलेल्या स्टारचा गिलच्या जागेवर दावा!
द्रविडशी पंगा, रोहितचंही ऐकलं नाही, टीमबाहेर काढलेल्या स्टारचा गिलच्या जागेवर दावा!
advertisement

शुभमन गिलला टीममधून वगळलं तर यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसन हे दोन पर्याय तयार आहेत, पण त्यातच आता आणखी एका खेळाडूने ओपनरच्या जागेवर दावा ठोकला आहे. सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीमध्ये इशान किशनच्या नेतृत्वात झारखंडने लागोपाठ 9 वा विजय मिळवला. मध्य प्रदेशविरुद्धच्या सामन्यात इशान किशनने वादळी अर्धशतक झळकावलं, त्यामुळे झारखंडने मध्य प्रदेशचा 1 रनने पराभव केला.

advertisement

झारखंडने पहिले बॅटिंग करत 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 181 रन केल्या, या आव्हानाचा पाठलाग करताना मध्य प्रदेशला 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 180 रनच करता आल्या, त्यामुळे या सामन्यात झारखंडचा एक रनने थरारक विजय झाला.

झारखंडचा कर्णधार इशान किशनने ओपनिंगला बॅटिंग करत 200 पेक्षा जास्तच्या स्ट्राईक रेटने 24 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. इशानने त्याच्या खेळीमध्ये 30 बॉल खेळून 5 सिक्स आणि 4 फोरच्या मदतीने 63 रन बनवले. इशान किशनची विकेट गेल्यानंतर झारखंडच्या कोणत्याच बॅटरला मोठा स्कोअर करता आला नाही. इशानशिवाय अनुकूल रॉयने 29 रन केले.

advertisement

इशान किशनचा द्रविडसोबत पंगा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात पुन्हा मोठी वाढ, कांदा आणि मक्याला काय मिळाला आज भाव? Video
सर्व पहा

राहुल द्रविड प्रशिक्षक असताना इशान किशन टीम इंडियातून बाहेर गेला होता. 2023-24 च्या मोसमात इशान किशनने वैयक्तिक कारणासाठी क्रिकेटमधून ब्रेक घेतला, तेव्हा प्रशिक्षक राहुल द्रविड आणि बीसीसीआयने इशान किशनला देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी आग्रह धरला, पण इशान किशनने याला नकार दिला, तेव्हापासून इशान किशन टीम इंडियातून बाहेर आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Team India : द्रविडशी पंगा, रोहितचंही ऐकलं नाही, टीमबाहेर काढलेल्या स्टारचा गिलच्या जागेवर दावा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल