शुभमन गिलचा प्लॅन चालेना
टीम इंडियाला तिसऱ्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात विकेट्स मिळाल्या नाहीत. जॉन कॅम्पबेल आणि शाई होप यांनी मैदानात पाय रोवून ठेवले होते. जॉन कॅम्पबेल आणि शाई होप यांनी यांनी विकेट पडू दिली नाही. त्यानंतर चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात देखील दोघांनी टीम इंडियाच्या बॉलर्सला विकेट मिळू दिली नाही. त्यानंतर शुभमन गिलला प्लॅन वर्क करत नसल्याने केएल राहुल शुभमनच्या मदतीला धावला.
advertisement
जडेजाने केएल राहुलचा प्लॅन ऐकला अन्...
केएल राहुल याने पहिल्या सत्रात ड्रिंक्स ब्रेकमध्ये टीम इंडिया एकत्र आली. केएल राहुल याने शुभमनला एक प्लॅन सांगितला. त्यावेळी रविंद्र जडेजा देखील तिथं उपस्थित होता. जडेजाने केएल राहुलचा प्लॅन ऐकला अन् पुढच्याच ओव्हरमध्ये शतक ठोकणाऱ्या जॉन कॅम्पबेल याला तंबूत पाठवलं. त्यामुळे टीम इंडियाला मोठा दिलासा मिळाला होता.
पाहा Video
Leader KL Rahul guided young captains Gill and Jadeja, and the result is here a dangerous partnership broken. KL is leading the team from the front as the senior-most playerpic.twitter.com/bGCJ5GMlQl
—
भारतीय कर्णधार शुभमन गिलने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर यशस्वी जयस्वालच्या 175 आणि कर्णधाराच्या नाबाद 129 धावांच्या जोरावर भारताने 5 बाद 518 धावांवर डाव घोषित केला. कुलदीप यादवच्या पाच विकेट्सच्या जोरावर वेस्ट इंडिजचा पहिला डाव 248 धावांवर संपला. 270 धावांची आघाडी घेतल्यानंतर भारताने फॉलोऑन लागू केला. तिसऱ्या दिवशी शाई होप आणि जॉन कॅम्पबेल यांनी आक्रमक फलंदाजी करत संघाची धावसंख्या 2 बाद 172 अशी केली. तिसऱ्या दिवशी खेळ संपला तेव्हा होप 66 धावांवर तर कॅम्पबेल 87 धावांवर खेळत होते. चौथ्या दिवसाच्या सुरूवातीला भारताकडे 97 धावांची आघाडी होती. पण चौथ्या दिवसानंतर वेस्ट इंडिजने लीड घेतली.