टीम इंडियाने पहिल्या इनिंगमध्ये 518/5 वर डाव घोषित केला, यानंतर वेस्ट इंडिजचा पहिल्या इनिंगमध्ये 248 रनवर ऑल आऊट झाला, त्यामुळे भारतीय टीमने वेस्ट इंडिजला फॉलोऑन दिला, पण त्यानंतर जॉन कॅम्पबेल आणि शाय होप यांनी झुंजार शतकी खेळी केल्या कॅम्पबेलने 115 तर होपने 103 रन केले, याशिवाय जस्टीन ग्रीव्हसने नाबाद 50 रनची खेळी केली. शेवटच्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या जेडेन सिल्सनेही 32 रन केले.
advertisement
पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडियाला फायदा
भारताकडून दुसऱ्या इनिंगमध्ये कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह यांना 3-3 विकेट मिळाल्या, तर मोहम्मद सिराजला 2 विकेट घेण्यात यश आलं. रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनाही 1-1 विकेट मिळाली. दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्ट इंडिजचा 390 रनवर ऑलआऊट झाल्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी 121 रनचं आव्हान मिळालं. या सामन्यात विजय मिळाला तर टीम इंडिया ही सीरिज 2-0 ने जिंकेल. याआधी अहमदाबादमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यातही टीम इंडियाचा विजय झाला होता. वेस्ट इंडिजविरुद्धची ही टेस्ट सीरिज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा भाग आहे, त्यामुळे ही सीरिज 2-0 ने जिंकल्याचा फायदा टीम इंडियाला होईल. पॉईंट्स टेबलमध्ये या सीरिजआधी टीम इंडिया तिसऱ्या क्रमांकावर होती.