India vs Pakistan u19 Asia Cup 2025 : अंडर 19 आशिया कप स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा 90 धावांनी पराभव केला आहे. खरं तर भारताने 240 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान अवघ्या 150 धावांवर ऑलआऊट झाली होती. त्यामुळे टीम इंडियाने हा सामना 90 धावांनी जिंकला आहे. विशेष म्हणजे भारताच्या या विजयासह Operation Sindoor हे सूरूच राहिलं आहे.
advertisement
खरं तर सिमेवर पाकिस्तानकडून कुरघोडी सूरूच असल्याने भारताने ऑपरेशन सिंदूर मोहिम राबवून त्यांना जोरदार उत्तर दिले होते.त्यानंतर याच मोहिमेचे पडसाद क्रिकेटच्या मैदानातही उमटले होते.त्यामुळे भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंशी नो शेक अँड करण्याची भूमिका घेतली होती. हीच भूमिका टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवसह इतर खेळाडूंनी घेतली आणि आज अंडर 19 संघाचा कर्णधार आयुष्य म्हात्रेच्या नेतृत्वात संघाने नो शेक अँडची भूमिका घेतली होती. विशेष म्हणजे संघाने ही भूमिका घेऊन पाकिस्तानला धुळ चारली.
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर भारताने दिलेल्या 240 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सूरूवात खराब झाली होती. भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर पाकिस्तानचं टॉप ऑर्डर कोसळलं होतं.त्यानंतर कर्णधार युसाफ आणि हुसेफा अहसानने पाकिस्तानचा डाव सावरला होता. फरहानने 23 तर हुझेफाने 70 धावांची सर्वाधिक खेळी केली होती.त्याव्यतिरीक्त कुणालाही मोठ्या धावा करता आल्या नाही आणि पाकिस्तानचा डाव 150 धावांवर ऑलआऊट झाला होता.त्यामुळे भारताने हा सामना 90 धावांनी जिंकला.
दरम्यान भारताकडून दिपेश देवेंद्रन आणि कनिष्क चौहानने प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या होत्या. किशन कुमार सिंहने 2 तर वैभव सूर्यवंशी आणि खिलान पटेलने एक एक विकेट घेतली होती.दरम्यान भारताकडून दिपेश देवेंद्रन आणि कनिष्क चौहानने प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या होत्या. किशन कुमार सिंहने 2 तर वैभव सूर्यवंशी आणि खिलान पटेलने एक एक विकेट घेतली होती. भारताने प्रथम फलंदाजी करताना 240 धावा केल्या होत्या. भारताकडून आरोन जॉर्जने 85 धावांची अर्धशतकीय खेळी केली होती. त्याच्या व्यतिरीक्त कनिष्क चौहानने 46 धावांची खेळी केली होती. या बळावर भारताने 240 धावा केल्या होत्या.
विशेष म्हणजे सामना संपल्यानंतर पाकिस्तानी खेळाडू शेक अँडसाठी वाट पाहत होते. पण आयुष्य म्हात्रेच्या संघाने पाकिस्तानी खेळाडूंशी हातमिळवणी न करता ते थेट बाहेर निघून गेले.
