TRENDING:

IPL 2026 Auction : 350 खेळाडू, पण मुंबई इंडियन्सच्या टार्गेटवर फक्त दोघं, आयपीएल लिलावात पलटनचा प्लान!

Last Updated:

आयपीएल 2026 साठीचा लिलाव मंगळवार 16 डिसेंबरला अबूधाबीमध्ये पार पडणार आहे. या लिलावासाठी 350 खेळाडूंनी त्यांचं नाव नोंदवलं आहे, यातल्या 77 खेळाडूंची निवड आयपीएलच्या 10 टीम करणार आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आयपीएल 2026 साठीचा लिलाव मंगळवार 16 डिसेंबरला अबूधाबीमध्ये पार पडणार आहे. या लिलावासाठी 350 खेळाडूंनी त्यांचं नाव नोंदवलं आहे, यातल्या 77 खेळाडूंची निवड आयपीएलच्या 10 टीम करणार आहेत. एकूण 77 खेळाडूंमध्ये 31 परदेशी खेळाडूंवर बोली लागू शकते. लिलावामध्ये तीन वेळची आयपीएल चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सकडे सर्वाधिक पैसे उपलब्ध आहेत, तर पाचवेळा आयपीएल जिंकलेल्या मुंबई इंडियन्सकडे सगळ्यात कमी 2.75 कोटी रुपये आहेत. या पैशांमध्ये मुंबईला 5 खेळाडूंना विकत घ्यायचं आहे.
350 खेळाडू, पण मुंबई इंडियन्सच्या टार्गेटवर फक्त दोघं, आयपीएल लिलावात पलटनचा प्लान!
350 खेळाडू, पण मुंबई इंडियन्सच्या टार्गेटवर फक्त दोघं, आयपीएल लिलावात पलटनचा प्लान!
advertisement

आयपीएलच्या मागच्या मिनी ऑक्शनमध्ये फास्ट बॉलर आणि ऑलराऊंडरना बंपर डिल मिळाल्या होत्या, हा ट्रेंड यावेळीही सुरू राहण्याची अपेक्षा आहे. कॅमरून ग्रीन, मथिशा पथिराणा आणि लियाम लिव्हिंगस्टोन या खेळाडूंवर सर्वाधिक बोली लागण्याची शक्यता आहे.

कोलकाता नाईट रायडर्स

उपलब्ध पैसे: 64.30 कोटी रुपये

उपलब्ध जागा: 12 (6 परदेशी)

2025 च्या संघातून फक्त 12 खेळाडूंना कायम ठेवल्यानंतर, केकेआर मोठ्या फेरबदलाच्या शोधात आहे आणि आयपीएल 2026 च्या लिलावात केकेआर अनेक मोठ्या खेळाडूंवर बोली लावेल. शाहरुख खानच्या मालकीच्या संघाला किमान दोन दर्जेदार विकेट कीपर बॅटर, ओपनर, दिग्गज आंद्रे रसेलसाठी एक आदर्श आणि दीर्घकालीन ऑलराऊंडर आणि काही दर्जेदार परदेशी फास्ट बॉलरची आवश्यकता आहे.

advertisement

चेन्नई सुपर किंग्ज

उपलब्ध पैसे: 43.40 कोटी रुपये

उपलब्ध जागा: 9 (4 परदेशी)

पाच वेळा चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्जसाठी, श्रीलंकेचा फास्ट बॉलर पथिराणाला परत आणणे ही त्यांची सर्वोच्च प्राथमिकता असेल आणि त्याच्या व्यतिरिक्त, ते काही परदेशी ऑलराऊंडरना देखील लक्ष्य करतील जे मधल्या फळीत बॅटिंग करू शकतात आणि रवींद्र जडेजाप्रमाणे बॉलने योगदान देऊ शकतात.

advertisement

सनरायझर्स हैदराबाद

उपलब्ध पैसे : 25.50 कोटी रुपये

उपलब्ध जागा : 10 (2 परदेशी)

लिलावात एसआरएचचे प्राधान्य एक दर्जेदार स्पिन बॉलर(कदाचित भारतीय) आणि एक परदेशी ऑलराऊंडर खेळाडू आणि काही भारतीय फास्ट बॉलर असेल, कारण मोहम्मद शमी लखनऊ सुपर जायंट्सला खरेदी करत होता.

लखनऊ सुपर जायंट्स

उपलब्ध पैसे : 22.95 कोटी रुपये

advertisement

उपलब्ध जागा: 6 (4 परदेशी)

एलएसजीने आयपीएल 2025 मध्ये एका प्रमुख परदेशी फास्ट बॉलरची सेवा गमावली आणि यावेळी त्यांना एका दिग्गज फास्ट बॉलरला टीममध्ये घ्यायची गरज आहे. त्याव्यतिरिक्त, त्यांचे प्राधान्य रवी बिश्नोईला परत टीममध्ये आणणे किंवा दुसरा अव्वल भारतीय स्पिन बॉलर मिळवणे असेल.

दिल्ली कॅपिटल्स

उपलब्ध पर्स: 21.80 कोटी रुपये

advertisement

उपलब्ध जागा: 8 (परदेशी 5)

दिल्ली कॅपिटल्सकडे पाच परदेशी जागा शिल्लक आहेत आणि ते वरच्या क्रमांकावर बॅटिंग करू शकतील असे किमान दोन परदेशी बॅटर आणि दोन परदेशी ऑलराऊंडर खेळाडूंना करारबद्ध करण्याची शक्यता आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

उपलब्ध पर्स: 16.40 कोटी रुपये

उपलब्ध जागा: 8(परदेशी 2)

आयपीएल 2026 च्या लिलावात आरसीबीचे प्राथमिक लक्ष्य त्यांच्या दुखापतग्रस्त परदेशी स्टार फास्ट बॉलर जोश हेझलवूडसाठी बॅकअप तयार करणे असेल. गतविजेत्यांनी लियाम लिव्हिंगस्टोनलाही सोडले आणि त्याच्यासारख्याच बदली खेळाडूला टीममध्ये घेण्याचा आरसीबीचा प्रयत्न असेल.

राजस्थान रॉयल्स

उपलब्ध पर्स: 16.05 कोटी रुपये

उपलब्ध जागा: 9 (1 परदेशी)

आयपीएल 2026 च्या लिलावापूर्वी रॉयल्सने तीन खेळाडू - रवींद्र जडेजा, सॅम करन आणि डोनोवन फरेरा यांना टीममध्ये आणलं. आता अबू धाबीमध्ये ते एका परदेशी विकेट कीपर बॅटरला लक्ष्य करू शकतात जो कदाचित तिसऱ्या क्रमांकावर खेळू शकेल. तसेच, रॉयल्सला एका स्पिन बॉलरची आवश्यकता आहे.

गुजरात जायंट्स

उपलब्ध पर्स: 12.90 कोटी रुपये

उपलब्ध जागा: 5 (4 परदेशी)

जीटीकडे आयपीएलमध्ये क्रमवारीत टॉप ऑर्डर फास्ट बॉलर आणि स्पिनर आहेत, पण त्यांना मधल्या फळीत फायरपॉवरची आवश्यकता आहे. कागिसो रबाडासाठी परदेशी फास्ट बॉलरचा बॅकअप घेणे ही जीटीची प्राथमिकता असेल.

पंजाब किंग्ज

उपलब्ध पर्स: 11.50 कोटी रुपये

उपलब्ध जागा: 4 (2 परदेशी)

पीबीकेएसने त्यांच्या आयपीएल 2025 संघातील 21 खेळाडूंना कायम ठेवले आहे आणि 2026 च्या लिलावात त्यांच्याकडे 11.50 कोटी रुपये आहेत. जॉश इंगलिसच्या जागी दुसऱ्या खेळाडूला टीममध्ये घेण्यासाठी पंजाब किंग्स मैदानात उतरेल.

मुंबई इंडियन्स

उपलब्ध पर्स: 2.75 कोटी रुपये

उपलब्ध जागा: 5 (1 परदेशी)

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात पुन्हा मोठी वाढ, कांदा आणि मक्याला काय मिळाला आज भाव? Video
सर्व पहा

आयपीएल 2026 च्या लिलावात, मुंबई इंडियन्स प्रामुख्याने रायन रिकेल्टनसाठी बॅकअप विकेट कीपरला करारबद्ध करण्याचा प्रयत्न करेल. मुंबईकडे एक परदेशी जागा उपलब्ध असल्याने, ते क्विंटन डी कॉक किंवा जॉनी बेअरस्टो सारख्या खेळाडूंना लक्ष्य करू शकतात. हे दोघेही आधी मुंबई इंडियन्सकडून खेळले आहेत.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 Auction : 350 खेळाडू, पण मुंबई इंडियन्सच्या टार्गेटवर फक्त दोघं, आयपीएल लिलावात पलटनचा प्लान!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल