आयपीएलच्या 19 व्या मोसमाच्या तारखांची घोषणा आयपीएलचे सीईओ हेमांग अमीन यांच्याकडून करण्यात आली आहे. मंगळवारी अबूधाबीमध्ये आयपीएल 2026 साठीचा लिलाव पार पडणार आहे, या लिलावाआधी आयपीएल आणि टीमच्या मालकांची बैठक पार पडली. आयपीएलच्या नियमांनुसार स्पर्धेची पहिली मॅच गतविजेती टीम खेळते, पण आरसीबीचं होम ग्राऊंड असलेल्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये मॅच होणार का नाही? याबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही.
advertisement
मंगळवारी आयपीएल लिलाव
आयपीएल 2026 साठीचा लिलाव मंगळवार 16 डिसेंबरला होणार आहे. या लिलावासाठी 369 खेळाडूंनी त्यांची नावं नोंदवली आहेत, यातल्या जास्तीत जास्त 77 खेळाडूंवर बोली लागणार आहे. सर्व 10 फ्रॅन्चायजींनी त्यांच्या 25 खेळाडूंचा कोटा पूर्ण केला तरच 77 खेळाडूंवर बोली लागेल.
दुसरीकडे बीसीसीआयने सर्व फ्रॅन्चायजींना आयपीएल 2026 साठी सगळे परदेशी खेळाडू पूर्ण मोसमासाठी उपलब्ध असतील, असं स्पष्ट केलं आहे. बांगलादेशचे खेळाडू संपूर्ण आयपीएल खेळतील का नाही? याबाबत साशंकता होती, कारण एप्रिल महिन्यात बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय मॅच होत्या. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात जॉश इंग्लिस, एश्टन अगर, विलियम सदरलँड, एडम मिलने, राइली रुसो हे खेळाडू पूर्ण मोसम उपलब्ध नसतील, त्यामुळे त्यांच्यावर बोली लागण्याची शक्यता कमी आहे.
