नसीम शाहला कडक शब्दांत वॉर्निंग
डेझर्ट वायपर्सचा वेगवान बॉलर नसीम शाह याने आपल्या बॉलिंगने पोलार्डला अडचणीत आणले होते. पोलार्डला धावा काढण्यासाठी संघर्ष करावा लागत असताना नसीम शाह वारंवार त्याच्यासमोर जाऊन काहीतरी बोलत होता आणि स्वतःच्या बॉलिंगवर कमालीचा गडबडलेला दिसत होता. मैदानावर कोणाचेही वर्चस्व सहन न करणाऱ्या पोलार्डला हे आवडलं नाही आणि त्याने नसीम शाहला कडक शब्दांत वॉर्निंग दिली. पोलार्डने डोळे वटारून बघताच पाकिस्तानी बॉलरची काहीशी घाबरगुंडी उडाली, मात्र तो देखील पोलार्डला भिडायला पुढं गेला होता. अखेर अंपायरने मध्यस्थी करत पोलार्डला शांत केलं आणि त्यानंतरच पुढचा खेळ सुरू झाला.
advertisement
पाहा Video
एमआयची टीम 136 रन्सवरच ऑल आऊट
या वादाव्यतिरिक्त नसीम शाहने आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. फायनलसारख्या दडपणाच्या मॅचमध्ये त्याने 4 ओव्हरमध्ये केवळ 18 रन्स देत 3 महत्त्वाचे विकेट्स आपल्या नावावर केले. विशेष म्हणजे त्याने कीरॉन पोलार्डचाही विकेट घेतला, जो 28 बॉल्समध्ये 28 रन्स काढून बाद झाला. डेझर्ट वायपर्सने प्रथम बॅटिंग करताना कॅप्टन सॅम करन याच्या नाबाद 74 रन्सच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 4 बाद 182 रन्सचा डोंगर उभा केला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना एमआय एमिरेट्सची टीम 18.3 ओव्हरमध्ये 136 रन्सवरच ऑल आऊट झाली.
एमआय एमिरेट्सचा पराभव
या विजयासह डेझर्ट वायपर्सने फायनलमध्ये 46 रन्सने विजय मिळवत चॅम्पियन होण्याचा मान पटकावला. नसीम शाहच्या प्रभावी बॉलिंगने एमआय एमिरेट्सच्या बॅटिंग लाईनअपचे कंबरडे मोडले. सॅम करनने 51 बॉल्समध्ये खेळलेली कॅप्टन इनिंग या विजयात निर्णायक ठरली. एमआय एमिरेट्सचा पराभव झाला असला तरी, पोलार्ड आणि नसीम शाह यांच्यातील तो राडा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या सिरीजच्या विजयामुळे डेझर्ट वायपर्सच्या गोटात सध्या आनंदाचे वातावरण आहे.
