सिएट अवॉर्ड्सच्या वेळी श्रेयस अय्यरकडून झालेली चूक रोहित शर्माने सुधारली, याचा व्हिडिओ पाहून चाहते रोहित शर्माचं कौतुक करत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. श्रेयस अय्यरला त्याच्या मागच्या वर्षातल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल ट्रॉफी देऊन गौरवण्यात आलं. ही ट्रॉफी घेऊन श्रेयस अय्यर स्टेजवरून खाली आला आणि खूर्चीवर जाऊन बसला, तेव्हा त्याने ट्रॉफी पायाजवळ ठेवली. श्रेयस अय्यरच्या मागे रोहित शर्मा बसला होता. ट्रॉफी खाली ठेवल्यानंतर श्रेयस अय्यर कार्यक्रम बघण्यात बिझी झाला.
advertisement
रोहितच्या कृतीचं चाहत्यांकडून कौतुक
रोहित शर्माने अजिबात वेळ न घालवता ट्रॉफी जमिनीवरून उचलली आणि टेबलवर ठेवली. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या एका चाहत्याने रोहितचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर शेअर केला. रोहितचा हा व्हिडिओ पाहून चाहते त्याचं कौतुक करत आहेत.
रोहितने संपवला ट्रॉफीचा दुष्काळ
रोहित शर्माने टीम इंडियाचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ 11 वर्षांनंतर संपवला. 2024 टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा विजय झाला, यानंतर 2025 मध्ये टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीही जिंकली, या दोन्ही स्पर्धांमध्ये रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार होता.