भारतीय टीमची घोषणा कधी?
माध्यमांच्या वृत्तानुसार, बीसीसीआय जानेवारीच्या सुरुवातीला 2026 च्या टी-20 वर्ल्डकपसाठी भारताच्या टीमची घोषणा करू शकते. टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात कोणत्याही टीमने सलग दोनदा जेतेपद पटकावलेले नाही. शिवाय, अद्याप कोणतीही टीम तीन वेळा विश्वविजेता बनलेली नाही. त्यामुळे, टीम इंडिया आगामी स्पर्धा जिंकून इतिहास घडवू शकते.
टीम निवडीची अंतिम तारीख काय?
advertisement
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) नियमांनुसार, स्पर्धा सुरू होण्याच्या 30 दिवस आधी सहभागी देशांना त्यांची टीम जाहीर करावे लागते. त्यामुळे टीम इंडियाला 8 जानेवारीपर्यंत त्यांच्या 15 सदस्यीय टीमची घोषणा करावी लागेल. पण, आयसीसीच्या परवानगीने स्पर्धा सुरू होण्याच्या एक आठवड्यापूर्वी टीम त्यांच्या लाइनअपमध्ये बदल करू शकतात.
BCCI केवळ T20 वर्ल्ड कपसाठी भारतीय टीम जाहीर करणार नाही तर न्यूझीलंड सीरिजसाठी देखील टीम जाहीर केली जाईल. पीटीआयच्या नुसार, बोर्ड एकाच वेळी भारत-न्यूझीलंड T20 सीरिज आणि टी-20 वर्ल्ड कपसाठी टीमची घोषणा करेल. किवींविरुद्धची पाच सामन्यांची सीरिज ही T20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची शेवटची तयारी असेल.
भारताचा पहिला सामना कोणाशी?
भारत T20 वर्ल्ड कपमध्ये आपला पहिला सामना 8 फेब्रुवारी रोजी वानखेडे स्टेडियमवर खेळेल. त्यानंतर भारतीय टीम 12 फेब्रुवारी रोजी दिल्लीत नामिबियाशी सामना करेल. भारताचा तिसरा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होईल. हा सामना कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाईल. भारताचा ग्रुप स्टेजचा शेवटचा सामना नेदरलँड्सशी होईल.
