Vaibhav Suryavanshi Vice Captain : भारताचा 14 वर्षीय स्टार खेळाडू वैभव सुर्यवंशीने नुकताच ऑस्ट्रेलिया दौरा गाजवला होता. या दौऱ्यानंतर आता त्याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.वैभव सूर्यवंशीला थेट 14 व्या वर्षीच संघाचा उप कर्णधार बनवण्यात आले आहे.त्यामुळे वैभव सुर्यवंशीच नशीब चमकलं आहे.
advertisement
वैभव सुर्यवंशी नुकताच ऑस्ट्रेलिया विरूद्ध युथ वनडे आणि टेस्ट सामने खेळला होता. या सामन्यात उत्कृष्ट खेळी केल्यानंतर आता तो मायदेशी परतला आहे. वैभव मायदेशी परतताच त्याला लॉटरी लागली आहे.कारण वैभव सूर्यवंशीला उप कर्णधार बनवण्यात आले आहे.
खरं तर येत्या 15 ऑक्टोबर 2025 पासुन रणजी ट्रॉफी 2025-26च्या स्पर्धेला सूरूवात होणार आहे. या स्पर्धेसाठी 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीची बिहारचा उप कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. बिहार क्रिकेट असोसिएशनने रविवारी याबाबतची घोषणा केली होती.
तसेच बोर्डाने अरुणाचल प्रदेश आणि मणिपूरविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी 15 सदस्यीय बिहार संघाची घोषणा केली आहे.बिहारचा पहिला सामना हा अरुणाल विरूद्ध पाटण्यामध्ये रंगणार आहे.त्यानंतर बिहारला मणिपूरचा सामना करण्यासाठी नैदादला जावं लागणार आहे. तसेच बिहार प्लेट गटात जिथे अरुणाचल आणि मणिपूर वगळता मेघालय, सिक्कीम आणि मिझोराम हे उर्वरित संघ आहेत.
वैभल सुर्यवंशीने वयाच्या 12 व्या वर्षी बिहारकडून रणजी पदार्पण केले होते. तेव्हापासून त्याने प्रचंड क्षमता दाखवली होती. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अवे मालिकेत भारताच्या 19 वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व केले होते.तसेच आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळत इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वात तरुण खेळाडू आणि सर्वात तरुण शतकवीर देखील बनला होता. त्याने 35 चेंडूत शतक ठोकले आणि आयपीएलमधील दुसरे सर्वात जलद शतक ठोकले.केवळ १४ वर्षांचा सूर्यवंशी याच्या नावावर आधीच अनेक विक्रम आहेत.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वैभवच्या धावा
दरम्यान वैभव सुर्यवंशीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील 3 युथ वनडे सामन्यात 124 धावा केल्या होत्या.या खेळीत त्याने 1 अर्धशतक ठोकलं होतं. तसेच दोन टेस्ट सामन्यात वैभव सुर्यवंशीने 133 धावा केल्या होत्या. या खेळीत त्याने एक शतक ठोकलं होतं.
रणजी ट्रॉफीच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी बिहारचा संघ:
पीयूष कुमार सिंग, भाष्कर दुबे, साकिबुल गनी (कर्णधार), वैभव सूर्यवंशी (उप कर्णधार), अर्णव किशोर, आयुष लोहारुका, बिपिन सौरभ, आमोद यादव, नवाज खान, साकिब हुसेन, राघवेंद्र प्रताप सिंग, सचिन कुमार सिंग, हिमांशु सिंग, खालिद आलम, सचिन कुमार