Jio चा 28 दिवसांचा स्वस्त प्लॅन
जिओच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लॅन आहेत. तुम्ही जिओच्या पोर्टफोलिओकडे काळजीपूर्वक पाहिल्यास, तुम्हाला सर्वात कमी किमतीत 28 दिवसांची व्हॅलिडिटी देणारा प्लॅन सापडेल. या प्लॅनची किंमत 189 रुपये आहे आणि हा प्लॅन तुम्हाला जिओच्या वेबसाइटवरील व्हॅल्यू सेक्शनमध्ये मिळेल. या प्लॅनमध्ये तुम्हाला 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. याचा अर्थ तुम्ही देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर तुम्हाला हवे तितके कॉल करू शकाल.
advertisement
Amazon ग्रेट इंडियन रिपब्लिक डे सेलमध्ये स्वस्तात मिळताय 20 हजारांचे फोन, पाहा किती होईल बचत
प्लॅनचे फायदे
डेटाबद्दल बोलायचे झाले तर, या प्लॅनमध्ये यूजर्सना एकूण 2 GB हाय स्पीड डेटा मिळतो. जो इंटरनेट वापरण्यासाठी वापरला जाऊ शकतो. याशिवाय यूजर्सना एकूण 300 टेक्स्ट मेसेज पाठवण्याची सुविधाही मिळते. या व्यतिरिक्त यूझर्सना या प्लॅनमध्ये Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud चे फ्री सब्सक्रिप्शन देखील मिळते.
WhatsApp Tips: तुमचे पर्सनल मेसेज कोणी वाचत तर नाहीये ना? असे करा लॉक
कॉलिंगसाठी परवडणारा प्लॅन
ज्या यूझर्सना जास्त इंटरनेटची गरज नाही आणि कॉलिंगसाठी परवडणारा प्लॅन हवा आहे त्यांच्यासाठी हा प्लॅन चांगला ठरू शकतो. जर तुम्हाला हा प्लॅन रिचार्ज करायचा असेल तर तुम्ही जिओच्या अधिकृत वेबसाइट, माय जिओ ॲप आणि गुगल पे, फोन पे इत्यादी ऑनलाइन पेमेंट ॲप्सद्वारे रिचार्ज करू शकता.