दररोज 7.61 लाख प्रवाशांना लाभ
ठाणे इंटरनल मेट्रो प्रकल्पाची एकूण लांबी 29 किलोमीटर इतकी असून, यामधील 26 किलोमीटर भाग एलिव्हेटेड (उंचावर) आणि 3 किलोमीटर भूमिगत असेल. या मार्गावर एकूण 22 स्थानके प्रस्तावित आहेत. त्यापैकी दोन स्थानके भूमिगत असतील आणि त्यापैकी एक ठाणे रेल्वे स्टेशनशी जोडले जाणार आहे. महामेट्रोच्या अंदाजानुसार, या मेट्रोमुळे दररोज सुमारे 7.61 लाख प्रवासी प्रवासाचा लाभ घेऊ शकतील.
advertisement
Pune Metro: प्रतीक्षा संपली! पुण्यात मेट्रो लाईन-2 चा विस्तार, इथं होणार डबल-डेकर फ्लायओव्हर
येथे उभारले जाणार मेट्रो स्टेशन
रायला देवी, वागळे सर्कल, लोकमान्य नगर बस डेपो, शिवाजी नगर, नीलकंठ टर्मिनल, गांधी नगर, डॉ. काशीनाथ घाणेकर थिएटर, मानपाडा, डोंगरी पाडा, विजय नगरी, वाघबिल, पातळी पाडा, आझाद नगर बस स्टॉप, मनोरमा नगर, कोलशेत औद्योगिक क्षेत्र, बालकुम नाका, बालकुम पाडा, राबोडी, शिवाजी चौक, ठाणे जंक्शन आणि न्यू ठाणे स्टेशन अशी प्रमुख 22 स्थानके असतील.
डब्यांची मेट्रो, वाढत्या लोकसंख्येचा विचार
सुरुवातीला केंद्र सरकारकडून ठाण्यात तीन डब्यांची मेट्रो चालविण्याचा प्रस्ताव होता. मात्र, ठाण्याच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून एकनाथ शिंदे यांनी सहा डब्यांची मेट्रो आवश्यक असल्याचे सांगितले, आणि केंद्र सरकारने या निर्णयास मान्यता दिली. महामेट्रोच्या मते, हा प्रकल्प ठाण्यासाठी टिकाऊ, स्वच्छ आणि आधुनिक सार्वजनिक वाहतूक पर्याय ठरेल. मेट्रो सेवेमुळे रस्त्यावरील ट्रॅफिक आणि प्रदूषण दोन्ही कमी होतील तसेच इंधनाची बचत होईल. सध्या प्रकल्पासाठी बोली प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
12,200 कोटींचा प्रकल्प
या प्रकल्पाला केंद्र सरकारने सप्टेंबर 2024 मध्ये 12,200 कोटी रुपये खर्चाच्या मंजुरी दिली होती. प्रकल्पाचं काम महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा मेट्रो) हाती घेणार आहे.






