Shocking Crime : पत्नीची निर्घृण हत्या, पतीनेच आत्महत्येचा बनाव रचला पण...भयंकर घटनेने विरार हादरंल!
Last Updated:
Husband killed Wife : विरारमध्ये पतीने पत्नीच्या हत्येनंतर आत्महत्येचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला. मात्र शवविच्छेदन अहवालामुळे सत्य उघड झाले. या धक्कादायक घटनेने संपूर्ण विरार हादरून गेला असून पोलिस तपास सुरू आहे.
विरार : विरार तालुक्यातील मांडवी परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून पतीनेच पत्नीची हत्या केल्याचे समोर आले आहे. या घडलेल्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी पतीला अटक केली आहे. घडलेल्या घटनेचा सध्या पोलीस अधिक तपास करत आहेत.
विरारमधील भयानक गुन्ह्याने खळबळ
मिळालेल्या माहितीनुसार मांडवी परिसरात राहणारा विजय चव्हाण (वय 30) याचा पत्नीशी वारंवार विवाहबाह्य संबंधाच्या कारणावरून वाद होत होता. या वादातूनच आरोपीने पत्नीचा गळा आवळून तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर गुन्हा लपवण्यासाठी त्याने पत्नीचा मृतदेह शेताजवळील एका खाणीत फेकून दिला.
आरोप लवपण्यासाठी केलं काय?
घटनेनंतर विजयने स्वतःला वाचवण्यासाठी पत्नी बेपत्ता झाल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. त्याने परिसरात शोध घेतल्याचे नाटक केले आणि नातेवाईक आणि पोलिसांकडे पत्नी अचानक गायब झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनीही विजयची तक्रार नोंदवली आणि तपास सुरु केला पण पोलिसांना तपासात महिलेच्या पतीवर संशय आल्याने त्यांनी तपासाची दिशा बदलली.
advertisement
दरम्यानच मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी पोस्टमार्टम केले ज्या अहवालात मृत्यूचे कारण गळा आवळल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. या अहवालामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि विजयची सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे समजले.
यानंतर पोलिसांनी आरोपी विजय चव्हाण याला तात्काळ अटक केली. सध्या आरोपीविरुद्ध संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 16, 2025 8:30 AM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Shocking Crime : पत्नीची निर्घृण हत्या, पतीनेच आत्महत्येचा बनाव रचला पण...भयंकर घटनेने विरार हादरंल!









