Thane News: गुलाल कोण उधळणार? ठाणे पालिकेचं बिगुल वाजलं, जाणून घ्या संपूर्ण निवडणूक कार्यक्रम

Last Updated:

Thane Municipal Corporation Election: राज्य निवडणूक आयोगाने आज (15 डिसेंबर) ठाणे महानगर पालिकेच्या निवडणुकींच्या घोषणा केल्या आहेत.

Thane News: ठाणे महानगर पालिकेचं बिगुल वाजलं, जाणून घ्या संपूर्ण निवडणूक कार्यक्रम
Thane News: ठाणे महानगर पालिकेचं बिगुल वाजलं, जाणून घ्या संपूर्ण निवडणूक कार्यक्रम
ठाणे: राज्य निवडणूक आयोगाने आज (15 डिसेंबर) ठाणे महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या घोषणा केल्या आहेत. ठाणे महानगर पालिकेच्या निवडणुका 15 जानेवारी 2026 या तारखेला होणार असून या निवडणुकांचा निकाल 16 जानेवारी 2026 तारखेला जाहीर होणार आहे. 29 महानगर पालिकांच्या निवडणुकींचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी जाहीर केली आहे.
ठाणे जिल्हा हा राज्याचे होऊन गेलेले मुख्यमंत्री आणि सध्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा बालेकिल्ला आहे. एकनाथ शिंदेंसाठी यंदाची महानगर पालिकेची निवडणुक चांगलीच प्रतिष्ठेची ठरणार आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदेंसह भाजपाच्या नेत्यांनी चांगलीच कंबर कसली आहे. शिंदेंसह भाजपाचे प्रमुख नेते पालिकेच्या निवडणूकीमध्ये विशेष मेहनत घेताना दिसत आहे. यंदाच्या महानगर पालिकेच्या निवडणुकीमध्ये शिंदेंची सेना बाजी मारणार की, भारतीय जनता पार्टी बाजी मारणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
advertisement
राज्यातील मुंबईसह 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान आणि 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. संपूर्ण राजकीय पक्षांचं ज्या निवडणूकीकडे लक्ष लागून राहिले होते, अखेर त्या निवडणूकीच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थात आज महानगर पालिकेच्या निवडणूकींचं बिगुल वाजलं आहे. तब्बल 29 महानगर पालिकांच्या निवडणुका प्रलंबित होत्या, आता अखेर त्या निवडणुकींच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. महानगर पालिकांच्या निवडणुका एकाच टप्प्यात पार पडणार आहे. महापालिका निवडणुकीच्या घोषणेसोबतच आज सायंकाळपासून आचारसंहिता लागू झाली आहे. दरम्यान, महानगरपालिकेच्या निवडणुका घोषित होताच, निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
Thane News: गुलाल कोण उधळणार? ठाणे पालिकेचं बिगुल वाजलं, जाणून घ्या संपूर्ण निवडणूक कार्यक्रम
Next Article
advertisement
Vinod Ghosalkar On Tejasvee Ghosalkar: तेजस्वींचा भाजपात प्रवेश, १२ तास आधी घरात काय घडलं? सासरे घोसाळकरांनी सगळंच सांगितलं...
तेजस्वींचा भाजपात प्रवेश, १२ तास आधी घरात काय घडलं? सासरे घोसाळकरांनी सगळंच सांग
  • तेजस्वींचा भाजपात प्रवेश, १२ तास आधी घरात काय घडलं? सासरे घोसाळकरांनी सगळंच सांग

  • तेजस्वींचा भाजपात प्रवेश, १२ तास आधी घरात काय घडलं? सासरे घोसाळकरांनी सगळंच सांग

  • तेजस्वींचा भाजपात प्रवेश, १२ तास आधी घरात काय घडलं? सासरे घोसाळकरांनी सगळंच सांग

View All
advertisement