65 वर्षीय अभिनेत्याची Dhurandhar ला तगडी टक्कर, बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई, 3 दिवसांतच लागला जॅकपॉट

Last Updated:
Dhurandhar Movie: एका प्रादेशिक चित्रपटाने धुरंधरला तोडीस तोड टक्कर द्यायला कंबर कसली आहे. तीन दिवसातच या फिल्मने मोठी कमाई केली आहे.
1/10
मुंबई: सध्या बॉक्स ऑफिसवर रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना यांच्या 'धुरंधर' चित्रपटाचा बोलबाला आहे. हा चित्रपट कोट्यवधींची कमाई करत असून रणवीर सिंगला तब्बल सात वर्षांनी मोठी हिट मिळाली आहे.

advertisement
2/10
मात्र अशातच, एका प्रादेशिक चित्रपटाने धुरंधरला तोडीस तोड टक्कर द्यायला कंबर कसली आहे. तीन दिवसातच या फिल्मने मोठी कमाई केली आहे.

3/10
दाक्षिणात्य सुपरस्टार नंदामुरी बालकृष्ण यांचा 'मायथोलॉजिकल' चित्रपट मैदानात उतरला आहे. तीन दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'अखंडा २ - तांडवम्' ने 'धुरंधर'ला जोरदार आव्हान दिले आहे आणि बॉक्स ऑफिसवर आपली दमदार कामगिरी दाखवत आहे.

4/10
हा चित्रपट 'धुरंधर' चित्रपटाच्या कमाईच्या वेगातही आपली जागा टिकवून आहे. 'अखंडा २' ही नंदामुरी बालकृष्ण यांच्या २०२१ मधील 'अखंडा' या सुपरहिट चित्रपटाचा सीक्वल आहे.

5/10
बोयापती सरिनू दिग्दर्शित या चित्रपटात नंदामुरी बालकृष्ण यांच्यासोबत संयुक्ता मेनन, आधी पिनिसेट्टी आणि हर्षाली मल्होत्रा यांसारखे मोठे कलाकार आहेत.

6/10
१२ डिसेंबर २०२५ रोजी सिनेमागृहात दाखल झालेल्या 'अखंडा २ - तांडवम्' ने पहिल्याच दिवशी २२.५० कोटी रुपयांची धमाकेदार ओपनिंग केली. दुसऱ्या दिवशीही या चित्रपटाने १५.६० कोटी रुपये कमावले.

7/10
आता तिसऱ्या दिवसाची रात्री ११ वाजेपर्यंतची १५ कोटी रुपयांची कमाई गृहित धरल्यास, या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर तीन दिवसांत एकूण ५३ कोटी रुपये जमा केले आहेत.

8/10
'अखंडा २ - तांडवम्' हा चित्रपट केवळ तेलुगू भाषेतच नाही, तर हिंदीसह तमिळ, मल्याळम आणि कन्नड यांसारख्या भाषांमध्येही प्रदर्शित झाला आहे. तेलुगू आवृत्तीतून सर्वाधिक ₹ २१.९५ कोटी रुपयांची कमाई झाली आहे. तमिळ डब आवृत्तीने ₹ ४३ लाख कमवले. कन्नड आणि मल्याळम आवृत्तीतूनही अल्प कमाई झाली आहे.

9/10
एका अहवालानुसार, 'अखंडा २ - तांडवम्' चा निर्मिती खर्च सुमारे २०० कोटी रुपये आहे. तीन दिवसांत ५३ कोटी रुपये कमावून चित्रपटाने सध्या आपल्या बजेटच्या २६.५ टक्के रक्कम वसूल केली आहे.

10/10
बॉक्स ऑफिसवर हिटचा टॅग मिळवण्यासाठी या चित्रपटाला ४०० कोटी रुपयांच्या जवळपास कमाई करावी लागणार आहे. त्यामुळे, 'अखंडा २' ला अजून मोठा पल्ला गाठायचा आहे, पण 'धुरंधर'सारख्या मोठ्या चित्रपटासोबत टक्कर देत केलेली ही दमदार कमाई नक्कीच कौतुकास्पद आहे.

Vinod Ghosalkar On Tejasvee Ghosalkar: तेजस्वींचा भाजपात प्रवेश, १२ तास आधी घरात काय घडलं? सासरे घोसाळकरांनी सगळंच सांगितलं...
तेजस्वींचा भाजपात प्रवेश, १२ तास आधी घरात काय घडलं? सासरे घोसाळकरांनी सगळंच सांग
  • तेजस्वींचा भाजपात प्रवेश, १२ तास आधी घरात काय घडलं? सासरे घोसाळकरांनी सगळंच सांग

View All
advertisement