मालिकेनेच रेणुका शहाणेंना बनवलं 'नॅशनल क्रश', आता मालिकांकडेच फिरवली पाठ, पण का?

Last Updated:
'सुरभी' या प्रसिद्ध टेलिव्हिजन शोमधून घराघरात पोहोचलेल्या रेणूका शहाणे आज एकाही मालिकेत का काम करत नाहीत? मालिकेत काम करण्यासाठी त्यांना नकार का?
1/9
दूरदर्शनच्या सुवर्णकाळात 'सुरभी' या लोकप्रिय कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचलेला एक चेहरा म्हणजे अभिनेत्री रेणुका शहाणे. रेणुका यांनी सुरभीनंतर अनेक सिनेमांत काम केलं पण सुरभीमधील त्यांची छबी प्रेक्षक आजही विसरू शकलेले नाहीत.

advertisement
2/9
रेणूका यांच्या प्रसन्न हास्याने आणि सहज अभिनयाने त्या काळात सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. पत्रांच्या ढिगाऱ्यात बसलेल्या रेणूका शहाणे आजही चाहत्यांना लख्ख आठवतात.   रेणुका शहाणे त्या काळात केवळ अभिनेत्री नाही तर नॅशनल क्रश ठरल्या होत्या. नॅशनल क्रश ही टर्म आता जरी आली असली तर त्या काळात रेणूका शहाणे या नॅशनल क्रशच होत्या. 

3/9
 एका टेलिव्हिजन मालिकेनं त्यांना इतकी लोकप्रियता मिळूनही दिली. पण त्यानंतर अनेक वर्षांपासून रेणूका टेलिव्हिजन मालिकांपासून दूर आहेत. यामागचं नेमकं कारण रेणुका शहाणे यांनी पहिल्यांदाच सांगितलं. 

4/9
 मालिकाविश्वातील वेळेचं गणित हेच त्याचं मालिका न करण्यामागचं प्रमुख कारण आहे.
मालिकाविश्वातील वेळेचं गणित हेच त्याचं मालिका न करण्यामागचं प्रमुख कारण आहे. "मालिकाविश्वातील वेळेच्या गणितामुळे मी तिथे काम करत नाही. त्या वेळेच्या चौकटीत मला सध्या काम करणं शक्य नाही", असं त्या म्हणाल्या.
advertisement
5/9
 त्या पुढे म्हणाल्या,
त्या पुढे म्हणाल्या, "मी आता केवळ अभिनय करत नाही तर लेखन, दिग्दर्शनही करते. त्यासाठी पुरेसा वेळ द्यावा लागतो. या सगळ्यात कुटुंबाला प्राधान्य तर असतंच."
advertisement
6/9
रेणुका शहाणे यांचं त्यांच्या कुटुंबावर प्रचंड प्रेम आहे. कुटुंब त्यांच्यासाठी पहिलं प्राधान्य आहे. त्यांनी लग्न आणि मुलांच्या जन्मानंतर अनेक वर्ष मोठ्या पडद्यापासून दूर राहणं पसंत केलं होतं. 

7/9
त्यांनी पुढे सांगितलं,
त्यांनी पुढे सांगितलं, "मी आजही असंच म्हणते की मी फुल टाइम आई आणि पार्ट टाइम अभिनेत्री, लेखन, दिग्दर्शक, निर्माती आहे. या कारणांमुळे मी मालिकेत काम करत नाही."
advertisement
8/9
'सुरभी' मालिकेमुळे मिळालेली लोकप्रियता आजही रेणुका शहाणेंच्या ओळखीचा मोठा भाग आहे. त्या काळात त्यांची स्माइल, सादरीकरणाची शैली आणि पडद्यावरची सकारात्मक ऊर्जा प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावणारी होती. 

9/9
रेणूका शहाणे यांचा 'उत्तर' हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. आई आणि मुलांच्या नात्यावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. अभिनेता अभिनय बेर्डेसोबत त्या स्क्रिन शेअर करत आहेत. 

Vinod Ghosalkar On Tejasvee Ghosalkar: तेजस्वींचा भाजपात प्रवेश, १२ तास आधी घरात काय घडलं? सासरे घोसाळकरांनी सगळंच सांगितलं...
तेजस्वींचा भाजपात प्रवेश, १२ तास आधी घरात काय घडलं? सासरे घोसाळकरांनी सगळंच सांग
  • तेजस्वींचा भाजपात प्रवेश, १२ तास आधी घरात काय घडलं? सासरे घोसाळकरांनी सगळंच सांग

View All
advertisement