Nashik Election: तयारीला लागा! नाशिक पालिकेच्या निवडणुका जाहीर, मतमोजणी कधी?
- Published by:Sachin S
Last Updated:
नाशिक : तब्बल ८ वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील महापालिका निवडणुकीचा अखेर मुहूर्त हाती लाागला आहे. राज्यातील २९ महापालिकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. तर राज्याचं लक्ष लागून असलेल्या नाशिक महापालिका निवडणुकीचंही (Nashik Municipal Corporation) बिगुल वाजलं आहे. नाशिक पालिकेसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. तर १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली. या परिषदेत निवडणूक आयोगाने नाशिकसह 29 महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी २९ महापालिकांचा कार्यक्रम जाहीर केला. नाशिक पालिकेसाठी १५ जानेवारी २०२५ रोजी मतदान होणार आहे, तर १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
advertisement
नाशिकमध्ये फेब्रुवारी २०१७ मध्ये निवडणूक पार पडली होती. एकूण १२२ जागांसाठी ही निवडणूक पार पडली होती. त्यावेळी भाजपने सर्वाधिक ६६ जागा जिंकल्या होत्या. त्या खालोखाल शिवसेनेनं ३५ जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता स्थापन केली होती. या निवडणुकीत मनसेला मोठा धक्का बसला होता. मनसेला फक्त ५ जागा जिंकता आल्या होत्या.
advertisement
असा असेल निवडणुकीचा कार्यक्रम
उमेदवारी अर्ज भरणे - २३ डिसेंबर
अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस - ३० डिसेंबर
उमेदवारी अर्जाची छाननी - ३१ डिसेंबर
अर्ज मागे घेण्याचे मुदत - २ जानेवारी
चिन्ह वाटप - ३ जानेवारी 2026
मतदान - १५ जानेवारी 2026
मतमोजणी - १६ जानेवारी 2026
नाशिकमध्ये पक्षीय बलाबल
भारतीय जनता पक्ष (भाजप)- ६६
advertisement
शिवसेना -३५
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP)- ०६
काँग्रेस०६
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) - ०५
अपक्ष / इतर -०४
एकूण- १२२
नाशिक महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना ही आधीच जाहीर झाली आहे. नाशिक महापालिकेची अंतिम प्रभाग रचना ऑक्टोबर २०२५ यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर आरक्षणाची सोडत ११ नोव्हेंबर २०२५ रोजी झाली आहे. या सोडतीनंतर १७ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत हरकती/सूचना मागवण्यात आल्या होत्या. तर प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे.
advertisement
या 29 महापालिकेत होणार निवडणूक
view commentsअहिल्यानगर, अकोला, अमरावती, भिवंडी-निजामपूर, बृहन्मुंबई, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, धुळे, इचलकरंजी, जळगाव, जालना, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, लातूर, मालेगाव, मीरा-भाईंदर, नागपूर, नांदेड-वाघाळा, नाशिक, नवी मुंबई, पनवेल, परभणी, पिंपरी-चिंचवड, पुणे, सांगली-मिरज-कुपवाड, सोलापूर, ठाणे, उल्हासनगर आणि वसई-विरार.
Location :
Nashik [Nasik],Nashik,Maharashtra
First Published :
December 15, 2025 4:32 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Nashik Election: तयारीला लागा! नाशिक पालिकेच्या निवडणुका जाहीर, मतमोजणी कधी?










