सोलापूर - महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या खाद्य संस्कृती पाहायला मिळते. सोलापूर शहरातील विजापूर वेसमध्ये असलेल्या रूपाभवानी मटन भाजनालयमध्ये नेहमीच गर्दी मटन आणि चिकन पासून तयार होणाऱ्या शिक कढई खाण्यासाठी खवय्यांची असते. तर या व्यवसायातून महिन्याला हॉटेल चालक किसन कांबळे 1 लाख रुपयांची उलाढाल करत आहे. या संदर्भात अधिक माहिती हॉटेलचे मालक किसन कांबळे यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.